Header AD

शेतकरी विरोधी `काळा कायदा` डोंबिवली कॉग्रेसचा व्हर्चुअल रॅलीत सहभाग
डोंबिवली  |  शंकर  जाधव  :  केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या बाबत पारित झालेला कायद्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून या काळा कायद्याची माहिती घेण्यासाठी व्हर्चुअल रॅली डोंबिवली कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला होता. कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालय आणि डोंबिवलीतील नगरसेविका हर्षदा भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात व्हर्चुअल रॅली दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.


यामध्ये कॉंग्रेस गटनेते नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक हृदयनाथ भोईरमाजी नगरसेवक जितेंद्र भोईर,नवीन सिंगरवी पाटीलमाजी नगरसेविका शारदा पाटीलशशिकांत चौधरीएकनाथ म्हात्रेअजय महाजन,सेवा दलाचे पदाधिकारी समशेर खान,डोंबिवली विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पमेश म्हात्रे,डोंबिवली ए ब्लॉक कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष प्रणव केणे,पर्यावरण विभाग वर्षा शिखरे, वर्षा जगताप,अशोक कापडणे,अजय पौळकर, विजय जाधव,हर्षद पुरोहित,निशिकांत रानडे,अखिल भोईर,शरद भोईर,अभय तावडे,दिलीप गायकवाड,शिला भोसले,दीप्ती दोषी,सुर्यकांत मंडपे,संदेश जाधव,कल्पिता पाठारे,प्रसाद पाठारे,मयूर शेळके आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


संगमनेरकोल्हापूरऔरंगाबादअमरावती,नागपूर आणि कोकण येथे कॉंग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरुद्ध एल्गार करत  शेतकरी बचाओ रॅली काढण्यात आली. शेतकरी विरोधी काळे कायदे महाराष्ट्र अडवणार अस सांगत व्हर्चुअल रॅली काढण्यात आली. डोंबिवलीत कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदर  डिजिटल रॅलीतील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात्मक भाषणे ऐकली.यावेळी कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात काळा कायदा जबरद्स्तीने अंमलात आणला आहे.


हा अन्यायाचा कायदा असून या अन्यायाला विरोध करण्यासाठी कॉग्रेसचे शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपने उभे राहण्यासाठी अश्या प्रकारची रॅली काढण्यात आली. माजी नगरसेवक नवीन सिंग म्हणाले, व्हर्चुअल रॅली महाराष्ट्रातील ६० हजार गावे सहभागी झाले होते.हा कायदा मोदी सरकारने २० मिनिटात पारित केला. शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.या कायद्यात बाजार समिती नसल्यास लाखो कामगार बेरोजगार होतील. अश्या प्रकारचा काळा कायदा केल्याबद्दल मोदि सरकारचा निषेध करत आहोत.


शेतकरी विरोधी `काळा कायदा` डोंबिवली कॉग्रेसचा व्हर्चुअल रॅलीत सहभाग शेतकरी विरोधी `काळा कायदा` डोंबिवली कॉग्रेसचा व्हर्चुअल रॅलीत सहभाग Reviewed by News1 Marathi on October 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads