Header AD

जोगिला तलाव पुनर्विकास कामामध्ये बाधित झालेल्या नागरिकांना बीएसयूपी योजनेतील घरे तातडीने वितरित करावीत महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेशठाणे | प्रतिनिधी : ठाणे महानगरपालिका हद्दीतील जोगिला तलाव पुनर्जीवित कामामध्ये या ठिकाणची जवळपास 350 घरे बाधित झाली होती. या नागरिकांनी महापालिकेच्या विकासामध्ये योगदान दिले आहे. त्यांना महापालिकेच्या वतीने हक्काची घरे उपलब्ध व्हावीत असा निर्णय घेण्यात आला होता, यानुसार मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सदनिका वाटपाचा करण्यात आला होता. सदरच्या सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा तातडीने लाभार्थींना द्यावा असे महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांना दिले आहेत.

 


ठाणे शहराचा विकास करीत असताना अनेक नागरिकांच्या निवासी व व्यावसायिक गाळे बाधित झाले आहेत. प्रभाग क्र. 22 अंतर्गत येत असलेल्या जोगिला तलावाचे पुर्नविकासाचे काम महापालिकेने हाती घेतले, यामध्ये 350 नागरिकांची घरे बाधित झाली, या नागरिकांवर अन्याय होवू नये व त्यांना हक्काची कायमस्वरुपी घरे मिळावीत यासाठी निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेच्यावतीने बी.एस.यू.पी योजना राबविण्यात आली असून सदर योजनेतील काही सदनिका राखीव ठेवून या नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आले. या सदनिकांचे वाटप देखील झालेले आहे. 


परंतु मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष ताबा देण्यात आला नव्हता. यासाठी संबंधितांकडून स्थानिक नगरसेवकांकडे सातत्याने मागणी होत होती. याबाबत स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने व नागरिकांची गैरसोय होवू नये या दृष्टीने निर्णय घेवून नागरिकांना सदर सदनिकांचा ताबा तातडीने देण्यात यावा असे देखील आदेश महापौर यांनी आयुक्तांना दिले आहे.


स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे यांचा वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून या नागरिकांना हक्काच्या घरात जाता यावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे या नागरिकांना लवकरच हक्काची घरे मिळणार आहेत. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सदरबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश  संबंधितांनादिले असल्याने काही दिवसांतच जोगिला तलाव पुर्नर्विकास कामामध्ये बाधित नागरिकांचे पुनर्वसन होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. 

जोगिला तलाव पुनर्विकास कामामध्ये बाधित झालेल्या नागरिकांना बीएसयूपी योजनेतील घरे तातडीने वितरित करावीत महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेश जोगिला तलाव पुनर्विकास कामामध्ये बाधित झालेल्या नागरिकांना बीएसयूपी योजनेतील घरे तातडीने वितरित करावीत महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेश Reviewed by News1 Marathi on October 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads