भिवंडीत लॉकडाऊन मुळे परिवर्तन, बार आणि रेस्ट्रॉरंटच रूपांतर झालेल्या हॉस्पिटलचे आरोग्यमंत्री यांनी केले ऑनलाईन उदघाटन
भिवंडी | प्रतिनिधी : कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनचा फटका शेतकरी, व्यापारी, नागरिक, विविध व्यवसाय सह हॉटेल, बार, रेस्ट्रॉरंट या सर्वांनाच बसला असताना भिवंडी शहरात मात्र जिथं दारू मिळायची तिथं आता दवा आणि उपचार मिळणार असल्याचे परिवर्तन झाले आहे, शहरातील पद्मानगर येथील 20 वर्षांपासून सुरु असलेला ममता बार आणि रेस्ट्रॉरंट बंद करून 25 बेडचे भव्य स्नेजोस - मल्टिस्पेशालीटी हॅास्पिटल सुरु केले असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन आज ऑनलाईन उदघाटन केले असून यासाठी शासनाकडून हवी ती योजना, मदत गरिबांसाठी या हॉस्पिटलला मिळणार असल्याचे सांगितले आहे.दरम्यान आमदार महेश चौघुले यांनी फित कापून, नारळ वाढवून हॉस्पिटल सुरु केले आहे, यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब राजे निंबाळकर, भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे राजेश चव्हाण, आर पी आय चे बबन घोडके आर पी आय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष स्वाती कांबळे, प्रवीण पाटील, ॲडव्होकेट विशाल निंबाळकर, डाॅक्टर समीर लटके व सर्व टिम, हरीचंन्द्र भोईर, विकास पाटील,, यंशवंत पाटील, सुरेन्द्र मुळे आदी मान्यवर उपस्थित होते , दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
आबासाहेब निंबाळकर मानव विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब राजे निंबाळकर यांनी 20 वर्ष जुना ममता बार आणि रेस्ट्रॉरंट बंद करून स्नेजोस - मल्टिस्पेशालीटी हॅास्पिटल सुरु केले असून या हॅास्पिटल स्पेशालीटीमध्ये मोफत रुग्णवाहीका सेवा, जीनेकोलॉजिकल शस्त्रक्रिया, लॅपरोस्कोपिक सर्जरी, कान, नाक, घसा तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रिरोग तज्ञ, फिजिओथेरपी, मधुमेह आदी सुविधा मिळणार आहे, या हॉस्पिटल मध्ये 25 बेड असून डॉ समीर लटके, डॉ तृप्ती दिनकर, डॉ पुनीत कुमार गुप्ता, डॉ श्यामसुंदर वर्मा, डॉ शशिकांत मशाल, डॉ स्नेहा वाघेला, डॉ शिवरंजनी पुराणिक, डॉ शाहिस्ता मन्सुरी 10 डॉक्टरांची टीम असून 18 स्टाफ आहे, सर्व सुविधा असणाऱ्या या हॉस्पिटलमुळे परिसरातील तब्बल दोन लाख नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Post a Comment