कल्याण | कुणाल म्हात्रे : कोवीड पार्श्वभूमीवर खर्च पाहता उत्पन्नाची बाजू पाहता नगरसेवक निधीची कामे तातडीने मार्गी लावण्यास तसेच विविध परिशिष्टात अंतर्भूत कामांची निकड लक्षात घेऊन प्राधान्य ठरवून ती कामे हाती घेण्यास प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असल्याने लोकप्रतिनिधीची मुदत संपण्याच्या कालावधीत त्यांच्या प्रभागात विकास कामासाठी वाट मोकळी झाल्याचे दिसत आहे.
३ सप्टेंबर२०२० रोजी स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेेल्या अंदाजपत्रकीय सर्व साधारण सभेमध्ये "नगरसेवक निधी" व "विविध परिशिष्टामधील कामे" सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती, त्यानुसार १४ सप्टेंबर२०२० रोजी महापौर, पदाधिकारी व सर्वपक्षीय गटनेते यांची बैठक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत झाली. सदर बैठकीच्या अनुषंगाने नगरसेवक निधीची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच महापालिकेची उत्पन्नाची बाजू लक्षात घेऊन आणि जमा महसूल विचारात घेऊन तसेच कोविड१९ ची सद्य परिस्थिती पाहता व त्यामुळे होणारा खर्च पहाता, विविध परिशिष्टात अंतर्भूत कामांची निकड लक्षात घेऊन प्राधान्य ठरवून ती कामे हाती घेण्याच्या सूचनाही आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
Post a Comment