Header AD

पालिकेच्या निष्क्रियतेवर सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी केले मुंडण




डोंबिवली | शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील कस्तुरी प्लाझा जवळील जैन मंदिर हे अनधिकृत असल्याचा आरोप करत १२ दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले होते.मात्र पोलिसांच्या अश्या प्रकारचे आंदोलन करण्यास अटकाव केल्याने निंबाळकर यांनी सदर मंदिराच्या समोर पालिकेचा जाहीर निषेध करत अश्या प्रकारचे बॅनर हाती घेऊन आंदोलन करत होते. गुरुवारी या आंदोलनाला १३ दिवस झाल्याने निंबाळकर यांनी मुंडण केले.पालिका प्रशासनाने आंदोलनाची दाखल न घेतल्यास अश्या प्रकारचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.   

  

निंबाळकर यांनी १३ दिवसांपूर्वी  आंदोलनाला सुरुवात केली.सदर मंदिरापासून ते पालिकेच्या विभागीय कार्यालयापर्यत चालत येत असताना डोंबिवली रामनगर पोलिसांनी त्यांना आंदोलन करताना थांबवत ताब्यात घेतले होते. परंतु हे आंदोलन सुरुच राहणार असून मंदिर ते विभागीय कार्यालय असे अर्धनग्न अवस्थेत चालत जाणार असल्याचे सांगितले होते.सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे अनेक वर्षापासून डोंबिवली पूर्वेकडील कस्तुरी प्लाझा जवळील जैन मंदिर अनधिकृत असल्याचा आरोप करत यावर पालिका प्रशासन का कारवाई करत असा जाब विचारला होता.त्यावर कारवाई होत नसल्याचे सांगत निंबाळकर यांनी काही वर्षापूर्वी डोंबिवली विभागीय कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन केले होते.


त्यावेळी रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र जोपर्यत कारवाई होत नाही तोपर्यत आंदोलन करतच राहणार असे निंबाळकर म्हणाले. निंबाळकर यांनी पुन्हा एकदा अश्या प्रकारचे आंदोलन केले होते.मंदिरासमोर आल्यावर त्यांनी अर्धनग्न अवस्थेत चालत जात असताना पोलिसांनी अडविले. मात्र आंदोलन करण्यास का अडकाव करत असा प्रश्न निंबाळकर यानी पोलिसांनी विचारला होता.पोलिसांनी त्यांचे काहीही न एेकता  त्यांना रिक्षात बसवून डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात आणले.पुढील सात दिवस आपले आंदोलन सुरु राहणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.गुरुवारी निंबाळकर यांनी पालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात मुंडण करून केले.


पालिकेच्या निष्क्रियतेवर सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी केले मुंडण पालिकेच्या निष्क्रियतेवर सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी केले मुंडण Reviewed by News1 Marathi on October 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लोकशाहीचे मूळ बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्मात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सत्कार.... मुंबई , प्रतिनिधी  :  लोकशाही जगाला भारताने दिली आहे.लोकशाही च...

Post AD

home ads