Header AD

हाथरस बलात्कार वंचित बहुजन आघाडी, वाल्मिक विकास संघाच्या वतीने कँडल मार्च
ठाणे |  प्रतिनिधी  :-  हाथरस येथे वाल्मिकी समाजाच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्या निषेधार्थ ठाणे शहरात वंचित बहुजन आघाडी आणि वाल्मिकी विकास संघ यांच्या वतीने वागळे  आगार डेपो ते इंदिरा नगर नाका दरम्यान कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच इंदिरा नगर नाका  येथे उपस्थित जनसमुदायाने मनीषा वाल्मिकी हिला आदरांजली अर्पण करून योगी सार्कच्या बरखास्तीची मागणी केली .
प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केली जात आहेत. त्याच अनुषंगाने ठाणेशहरात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही  रॅली  काढण्यात आली . योगी- मोदी मुर्दाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या, या मोर्चामध्ये महिलांचा सहाभाग मोठ्या संख्येने होता.
वागले टीएमटी आगार येथून अत्यन्त शिस्तबद्ध पद्धतीने वाल्मिकी समाजाचे नागरिक हातामध्ये मेणबत्ती घेऊन या मार्च मध्ये सहभागी झाले होते. वाल्मिकी विकास संघाचे सुरेंद्र दावडा, दशरथ आठवाल, टिंकू आठवल, राजेश डिंगा, पावन शिरस्वाल , विशाल आठवल, बाळाराम कागडा , मालकीत बम्बक,जिलेसिंग बोध, राजवीर बांबूक, राकेशकुमार चौहान, विरपाल भाल , नरेश भगवाने , श्याम पारचा , संजय तुशांबर , राम बांबूक सोनी चौहान आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.


यावेळी राजाभाऊ चव्हाण म्हणाले कि,   योगींच्या राज्यात दिवसाढवळ्या एका दलित कन्येवर अत्याचार होतो आणि रात्रीच्या अंधारात पुरावे नष्ट केले जातात; अशा मुख्यमंत्र्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.  तेथील जिल्हाधिकारी पीडित मुलीच्या कुटंबाला धमकावत आहेत. त्यामुळे त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी केली.

हाथरस बलात्कार वंचित बहुजन आघाडी, वाल्मिक विकास संघाच्या वतीने कँडल मार्च हाथरस बलात्कार वंचित बहुजन आघाडी,  वाल्मिक विकास संघाच्या वतीने कँडल मार्च  Reviewed by News1 Marathi on October 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads