Header AD

अन्यथा कृषी विधेयका विरोधात न्यायालयात धाव घेतली जाईल मनोज शिंदे


■चिपळुनात कृषी विधेयकाविरोधातील सह्यांच्या मोहीमेच्या आढावा बैठकीत दिली माहिती...


चिपळूण  | प्रतिनिधी  :  केंद्र शासनाने लागू केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. या कृषी विधेयकाविरोधात महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार सह्यांची मोहीम सुरू आहे. महाराष्ट्रात साडे तीन लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आदी नेत्यांच्या उपस्थितीत ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींना निवेदन दिले जाणार आहे. यानंतर ही कृषी विधेयक रद्द झाले नाही तर न्यायालयात धाव घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांनी चिपळुणात कृषी  विधेयकाविरोधातील सह्यांच्या मोहिमेच्या आढाव्या दरम्यानच्या बैठकीत दिली. 


यावेळी सुरुवातीला चिपळूण काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अन्वर जबले, तर काँग्रेस काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने सुधीर शिंदे यांच्यासह अन्य नगरसेवक तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीदेखील उत्स्फूर्तपणे स्वागत केले.  यानंतर प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात चिपळुनात सह्यांची मोहीम आणखी वाढवली जाईल. कृषी विधेयक व कामगार कायदा सर्वसामान्यांच्या विरोधात आहे. या दोन्ही विधेयकांना कडाडून विरोध केला पाहिजे, असे आवाहन केले. तर भविष्यात चिपळुनात काँग्रेस पक्ष मजबूत झालेला पहावयास मिळेल, असे शेवटी स्पष्ट केले. 


तर जिल्हाध्यक्ष  ऍड. विजय भोसले, निरीक्षक अशोक जाधव व माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू थरवळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कृषी विधेयक व कामगार कायद्याला काँग्रेसचा कडाडून विरोध राहील, असे स्पष्ट करताना शेतकरी व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक भूमिका घेतली जाईल, असे स्पष्ट केले. 


तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाचा आढावा घेताना हे विधेयक शेतकरी विरोधी कसे आहे? याची माहिती दिली. या कृषी विधेयकाविरोधात महाराष्ट्रात सह्यांची मोहीम सुरू आहे. महाराष्ट्रात साडे तीन लाख सह्या तर चिपळूण तालुक्यात तीन एक हजार सह्यांची मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे यावेळी नमूद केले. तर आपण गेली तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करीत असून या दौऱ्याना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस पक्षात गट तट नसतात आणि असले तरी ते एकदा बसवून मिटविले जातील, अशी ग्वाही दिली. 


यावेळी ज्येष्ठ नेते सुधिर दाभोळकर, प्रांतिक सदस्य इब्राहीम दलवाई, नगरसेवक करामत मिठागरी,सफा गोठे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, माजी तालुकाध्यक्ष गौरी रेळेकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अन्वर जबले, अनुसूचित जाती जमाती विभाग तालुकाध्यक्ष सुर्यकांत चिपळूणकर, संजय जाधव, अश्फाक तांबे, राकेश दाते, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, माजी नगरसेवक सुरेश राऊत,  लियाकत शहा, संजय साळवी, जिल्हा सरचिटणीस रफिक मोडक, मनोज शिंदे, ऋषिकेश शिंदे, संजय जाधव, रुपेश आवले आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


अन्यथा कृषी विधेयका विरोधात न्यायालयात धाव घेतली जाईल मनोज शिंदे अन्यथा कृषी विधेयका विरोधात न्यायालयात धाव घेतली जाईल मनोज शिंदे Reviewed by News1 Marathi on October 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads