Header AD

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया तील डॉक्टरांनी वाचविले १ वर्षाच्या बाळाचे प्राण

 

■ठाण्यातील दिव्या उमाशंकर यादव या १ वर्षाच्या बाळाचे प्राण वाचविण्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया तील डॉक्टरांना यश मिळाले आहे...


ठाणे  | प्रतिनिधी : ठाण्यातील  दिव्या उमाशंकर यादव हे १ वर्षाचे बाळ पाण्याच्या बादलीत पडून बेशुद्ध झाल्याने त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तात्काळ उपचार करून त्याचे प्राण वाचविण्यास बालरोग विभागाच्या डॉक्टरांना यश मिळाले आहे.


मंगळवार दिनांक 27 ऑक्टोंबर, 2020 रोजी  ठाण्यातील वाघोबा नगर, कळवा येथील चाळीत राहणारे दिव्या उमाशंकर यादव हे बाळ खेळत असताना पाण्याचा बादलीत पडले. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते बेशुद्ध झाले. त्याच्या आईवडिलांनी त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता हॉस्पिटलने दाखल करण्यास नकार देवून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्यास सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बाळाला आणताच बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाला तपासून तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले. भरती करताना बाळ बेशुद्ध अवस्थेत होते, त्याचे शरीर थंड पडले होते. बाळाला आकडी येऊन रक्तदाबही कमी झाला होता.


छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाच्या आकडीवर तात्काळ उपचार सुरु करून फुफ्फुसातील पाणी काढले. बाळाला ऑक्सिजन लावून तब्बेत स्थिर केली आहे. रुग्णालयातील बालरोग विभागातील विभागप्रमुख प्रा. डॉ. वंदना कुमावत, सहयोगी प्रा. डॉ. शैलजा पोतदार, अधिव्याख्याता डॉ. श्रीकांत जोशी, रेसिडेन्ट डॉ. पियुष व डॉ. नीरा यांच्या अथक व तातडीच्या प्रयत्नांमुळे १ वर्षाच्या चिमुकलीला जीवदान मिळाले आहे.  सध्या या बाळाची तब्बेत स्थिर असून जीवावरचा धोका टळला आहे. दरम्यान बाळाच्या पालकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया तील डॉक्टरांनी वाचविले १ वर्षाच्या बाळाचे प्राण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया तील डॉक्टरांनी वाचविले १ वर्षाच्या बाळाचे प्राण Reviewed by News1 Marathi on October 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads