भिवंडी | प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाने भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष पदावर तब्बल नऊ वर्षां पासून कार्यरत शोएब खान गुड्डू यांची शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची नियुक्ती केली आहे .परंतु भिवंडी महानगरपालिकेचे कॉग्रेस नगरसेवकांसह पदाधिकारी यांच्या कडून रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्तीस विरोध केला जात असून त्याविरोधात बंड पुकारले आहे .भिवंडी महानगरपालिकेत सध्या काँग्रेस चे ४७ नगरसेवक असून त्यापैकी १८ नगरसेवकांनी डिसेंबर २०१९ मधील महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवारा विरोधात मतदान करीत बंडखोरी केली होती .त्यानंतर प्रदेश काँग्रेस ने भिवंडी शहरातील या घटनेची गांभीर्याने दखल घेत शोएब खान गुड्डू यांची पदावरून मुक्तता केली आहे .
शोएब खान गुड्डू यांची २०१२ मध्ये शहर काँग्रेस पदावर नियुक्ती केल्या पासून महानगरपालिका सभागृहात काँग्रेस पक्षाचे संख्याबळ वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावली असून यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेस मजबूत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून त्यांना पदावरून दूर करताना प्रभारी म्हणून केलेली नेमणूक ही चुकीची असल्याचा आरोप नगरसेविका फरजाना इस्माईल रंगरेज यांनी केला असून काँग्रेस प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्ती विरोधात बंड पुकारीत काँग्रेस नगरसेवक पदाचा राजीनामा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांना पाठविला आहे .
रशीद ताहीर यांच्या नियुक्ती विरोधात काँग्रेस नगरसेवक पदाधिकारी यांच्यात प्रचंड रोष असून ,त्यांनी नेहमीच काँग्रेस विरोधात भूमिका घेत पक्षाच्या उमेदवारा विरोधात काम केले असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाची शहरात वाढ न होता अधोगती होणार असल्याने दीड वर्षां नंतर महानगरपालिका निवडणूका असून त्या वेळेस पक्षाला याची किंमत मोजावी लागणार असल्याने प्रदेश काँग्रेस पक्षाने अध्यक्ष पदा वरील रशीद ताहीर यांच्या नियुक्तीचा फेरविचार न केल्यास सर्व नगरसेवक काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा नगरसेवक फराज बहाउद्दीन यांनी करीत २९ काँग्रेस नागरसेवकां पैकी २१ नगरसेवकांनी आपल्या राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केल्या आहेत अशी माहिती पत्रकाराशी बोलताना स्थायी समिती सभापती व गटनेता हलीम अन्सारी यांनी
दिली आहे .
Post a Comment