Header AD

अँड्रॉईड ऍप्लिकेशनचा सदुपयोग - ऑनलाईन लाईव्ह काकड आरती..

सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक सोशल मीडिया माध्यमांचा उपयोग करून, बरेच जण एकाच वेळी अनेक ठिकाणाहून एकाच जागी लाईव्हच्या माध्यमातून एकवटत आहेत. आपल्याच्या सानिध्यात राहण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ऍपचा चांगला उपयोग केला जात आहे. जेणेकरून घरच्या घरी बारसे किंवा इतर छोटे-मोठे कार्यक्रम साजरे केले जात आहे.. अशातच कल्याणच्या लेले कुटुंबिय यांनी ठाण्यात राहणा-या सौ. अमृता योगी (बहीण) आणि योगी कुटुंबियांसमवेत एका ऑनलाईन ऍपच्या द्वारे लाईव्ह काकडारतीचा कार्यक्रम १८ मे २०२०, पासून सकाळी ते या वेळेत सुरू केला.

#kakadaratidarshan Anand lele,  श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, अमृता योगी, कार्तिकी एकादशी

लेले कुटुंबिय जवळपास गेली २० वर्षे न चुकता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनुग्रहित असून, प्रत्येक एकादशीला नित्यनेमाने काकड आरती करतात.  अनेक भक्त-मंडळी त्यांच्याकडे न चुकता सकाळी वाजता काकड आरतीला हजर राहतात. परंतु या लॉकडाऊन काळात एकमेकांच्या घरी जाता येत नसल्यामुळे श्री. अरुण लेले यांचे चिरंजीव आनंद लेले यांनी सर्वांना एकत्रित काकड आरतीचा लाभ मिळावा म्हणून सोशल मीडियाचा सदुपयोग करत अनेक जणांना या झूम ऍपद्वारे एकत्र आणले.

या काकड आरतीचे व्हिडिओ सुद्धा ते ऍपद्वारे रेकॉर्ड करून ठेवतात. जेणेकरून पुढे पाठी पुन्हा कुणाला हवे असतील तर. भूपाळी, काकड आरती, पंचपदी आणि त्यानंतर फेर-धरणे या क्रमाने साधारण एक ते दीड तास ही काकड आरती चालते. यातील सगळी पदे, आरत्या श्री. आनंद हे स्वतः म्हणत असून, बाकीचे जण त्यांच्या पाठोपाठ गायन किंवा श्रवण करतात. जमलेल्या सर्व मंडळींना काकड आरती म्हणता यावी म्हणून आरतीची पुस्तके pdf स्वरूपात तयार करून सर्वांना पाठवली जात आहेत. 🙂त्यानंतर आरतीस उपस्थित असलेल्या मंडळींपैकी एक जण गायनसेवा किंवा आनंद लेले गायनसेवा करतात, त्यानंतर काकड आरतीत सामील झालेला प्रत्येक जण आपला अनुभव सांगतो आणि अशा प्रकारे काकड आरती सोहळा संपन्न होतो. लॉकडाऊन संपून पुढील सर्व परिस्थिती स्थिरस्थावर होईपर्यंत म्हणजेच अगदी कार्तिकी एकादशीपर्यंत सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.

भानुदास तान्हाजी पानमंद (न्यूज१ मराठी प्रतिनिधी)   

७५०६९१७७८९

अँड्रॉईड ऍप्लिकेशनचा सदुपयोग - ऑनलाईन लाईव्ह काकड आरती..  अँड्रॉईड ऍप्लिकेशनचा सदुपयोग - ऑनलाईन लाईव्ह काकड आरती.. Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads