Header AD

सात वर्षांपूर्वी डोंबिवलीत धावली होती `डबल डेकर`बस

 डोंबिवली | शंकर जाधव  : मुंबईतील प्रत्येकाने`डबल डेकर`बसने नक्कीच प्रवास केला असेल.या प्रवासाचा आनंद मिळावा म्हणून मुंबईच्या धर्तीवर मनसेने डोंबिवलीतील प्रथमच `डबल डेकर` सुरु करण्याचा प्रयत्न केला.सात वर्षापूर्वी मनसेकडे परिवहन समिती सभापती पद असताना डोंबिवलीकरांनी शहरातील रस्त्यावर `डबल डेकर`बस धावताना पहिली होती. डोंबिवली सारख्या वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरात अशी बस चालवणे हे खरे तर दिव्यच होते.बस सुरु झाल्याचे पाहून सर्व डोंबिवलीकर सुखावले होते. पण हा आनंद निकृष्ट दर्ज्याच्या काही तासंपुरता राहिला. त्यानंतर आजतागायत डोंबिवलीत पुन्हा `डबल डेकर`बस धावली नाही. आजही परिस्थिती काही बदललेली नाही.परंतु मनसेने  विकासाचे स्वप्न पाहिले होते ते थोड्या प्रमाणात का होईना पूर्ण केले.त्यावेळचे सभापती राजेश कदम आणि सर्व सदस्यांनी मिळून विशेषतः इरफान शेख  यांनी मिळून एक प्रयत्न करण्याचे ठरविले होते. या शहरातून जिथे वाहतुकीस गर्दी होते व ज्या इतर शहरांमध्ये नोकरीनिमित्त जास्तीत जास्त प्रवासी जातात जातात त्यांना सुसह्य प्रवास व्हावा ह्यासाठी `डबल डेकर` बसज्या बेस्टच्या मुंबईला धावतात त्या धर्तीवर डोंबिवली-वाशीडोंबिवली-ठाणे अशा डबल डेकर बस आपण सुद्धा सुरू कराव्यात आणि त्यातून कल्याण-डोंबिवलीकरांना सुखाचा प्रवास व्हावायासाठी मुंबईहून खास डबल डेकर बस मागवून सन २०१३-१४  डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकात त्याची चाचणी सुद्धा घेतली.यावेळी काही पत्रकार आणि शहरातील काही ज्येष्ठ नागरिक, जागरूक नागरीक आणि परिवहन सेवेतील अधिकारी वर्ग उपस्थित होते. ही बस रस्त्याने धावताना पाहून `डोंबिवलीची मुंबई` होईल असे कौतुकाने काही नागरिकांनी कदम यांनी म्हणाले होते. त्यावेळी पत्रकारहि या घटनेचे साक्षीदार झाल्याने दुसऱ्या दिवशी विविध वृत्तपत्रात याची ठळक बातमी छापून आली.त्यावेळी सोशल मिडीया नसल्याने लागलीच वेबचॅनल, युट्युब आणि फेसबुकला ही बातमी व्हायरल होण्याचा प्रश्नच नव्हता.नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर या घटनेची माहिती दिली. दुपारच्या वेळी ही `डबर डेकर` बस रस्त्याने धावताना पाहून इमारतीच्या टेरेसवरून,घराच्या बाल्कनीतून तर रस्त्याच्या कडेला हे दृश्य पाहताना डोंबिवलीकरांना आनंद वाटत होता.कोणीतरी आपल्या कॅमेऱ्याने हे दृश्य कैदहि केले असेल. काही वेळात बस पुन्हा इंदिरा चौकात आली आणि त्यानंतर आजतागायत पुन्हा `डबर डेकर` बस रस्त्यावर धावली नाही. परिवहन व्यवस्थापनाचा आणि मनसेचा हा प्रयत्न निकृष्ट रस्त्यामुळे प्रयोग जरी फसला असला तरी आजहि उत्कृष्ट दर्ज्याचे रस्ते,वाहतुकीचे नियोजन, सिग्नल यंत्रणा आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची इच्छाशक्ती असल्यास पुन्हा एकदा डोंबिवलीत `डबर डेकर` बस धावू शकते असे डोंबिवलीकरांचे म्हणणे आहे. तर या घटनेची आठवण करून देत सात-आठ वर्षानंतर आजही परिस्थिती काही बदललेली नाही परंतु अभिमान आहे की मला त्या वेळेला असे आधुनिक विचारांचेदांडगी इच्छाशक्ती असलेले सहकारी लाभले त्याच्यामुळे आम्ही जे विकासाचे स्वप्न पाहिले होते ते थोड्या प्रमाणात का होईना पूर्ण केले असे राजेश कदम म्हणाले.सन २०१३-१४  पालिकेच्या परिवहन समितीचे सभापती पद मनसेकडे आले. राजेश कदम यांची परिवहन सभापती पदभार स्वीकारल्यावर इरफान शेखदीपक भोसलेआरिफ पठाण भाऊसाहेब चौधरीदत्ता खंडागळेमहेश जोशी सुरेंद्र आढाव यांना एकत्र घेऊन परिवहन व्यवस्थापनास सहकार्य केले. इरफान शेखबस यांत्रिक धुलाई मशीनयांत्रिक टायर पंचर मशीनकंडक्टरचा हातात असलेले आधुनिक तिकीट वेन्डींग मशीनबस मधील जीपीएस सिस्टिमवातानुकूलित बस गाड्या हे आणि असे अनेक आधुनिक कामे या काळात घडलीयाला  अत्यंत हुशार आणि दांडगी इच्छा शक्ती असलेले प्रशासकीय अधिकारी त्यावेळचे परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत याची जोड मिळाली. याच काळात परिवहन उपक्रमाचे सर्वात मोठे वार्षिक बजेट जे दोनशे कोटीच्या वर मंजूर झालेपरिवहन उपक्रमासाठी त्यावेळच्या सरकारने म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने त्यांची योजना होती. जेएनएनयुआरएम ह्या योजनेतून परिवहन उपक्रमाला २०५ बस मंजूर झाल्या व संपूर्ण शहरात आधुनिक बस स्टॉपपालिकेच्या डेपोंचा आधुनिकीकरण अशा काही गोष्टी व काही कामे मंजूर झाली व ती कालांतराने कार्यान्वित सुद्धा झाली, सुधीर राऊत व त्यांचे सहकारी अधिकारी कदमआठवलेभोसले यांनी सुद्धा तेवढेच त्यासाठी मेहनत घेतली व इतर सर्व सहकारी कर्मचारी त्याच्यासाठी कार्यरत होतेत्यामुळे महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या खात्यात ज्या काही बस आहेत ही त्या वेळच्या आघाडी सरकारची देण आहे व या सर्व लोकांची मेहनतजेएनएनयूआरएम (जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रेनेवल मिशन) जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरूत्थान योजना ही  सध्याची "स्मार्ट सिटी" योजना आघाडी सरकारने पूर्णत्वास आणली असेही कदम म्हणाले.


सात वर्षांपूर्वी डोंबिवलीत धावली होती `डबल डेकर`बस सात वर्षांपूर्वी डोंबिवलीत धावली होती `डबल डेकर`बस Reviewed by News1 Marathi on October 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads