Header AD

ठाणे शहर जि सेवादल काँग्रेसच्या वतीने शेतकरी कामगार विघेयक कायदा विरोधात नागरिकांच्या "सह्याची मोहीम" सुरू
ठाणे  | प्रतिनिधी  : शेतकरी आणि कामगार वर्ग हा देशाचा मुख्य कणा असून केद्रातील भा.ज.पा.सरकारने या महत्त्वाच्या वर्गावरच घाव घातला असून काँग्रेस पक्ष हे कदापी सहन करणार नाही सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पूनर्विचार करायला भाग पाडेल असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलासराव औताडे यांनी आज ठाण्यातील कार्यक्रमात व्यक्त केला.अ.भा.काॅग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.2 ऑक्टोबर "राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विघेयक व काॅग्रेस सरकारच्या कारकिर्दीत कामगारांना सुरक्षा देण्याकामी घेतलेले निर्णय बदलण्याची तयारी चालु केली आहे या दोन्ही विधेयकामुळे कीसान व कामगार हे देशोधडीला लागणार असून या निर्णयाविरोधात कामगार वर्ग व नागरिकांच्या "सह्याची मोहीम" ठीकठीकाणी चालू असून ठाणे शहर (जिल्हा)सेवादलाचे अध्यक्ष शेखर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सेवादल काँग्रेसच्या वतीने ठाण्यातील स्टेशन रोड येथे सह्यांची मोहीम चालू करण्यात येणार असून.या मोहिमेची सुरूवात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल काँग्रेस अध्यक्ष विलासराव औताडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी ठाणे शहर (जि.) काँग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण हेही उपस्थित होते याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुमण अग्रवाल,प्रदेश काँग्रेस सदस्य सुखदेव घोलप,अँड.प्रभाकर थोरात,अनिस कुरेशी जिल्हा इंटक अध्यक्ष सचिन शिंदे,युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी,ठाणे शहर(जि)काँग्रेस सेवादल कार्याध्यक्ष ऋषिकेश तायडे,आकाश रहाटे,महेश पाटील,जिया शेख,वासिम हजरत, स्वप्नील भोईर, डॉ.जयेश परमार, नरेंद्र कदम, माधुरीताई  शिंदे, संदीप शिंदे,विनर बिंद्रा, सोनललक्समि घाग,विनीत तिवारी, अजित ओझा, शिरीष घरात, प्रकाश मांडवकर, रमेश इंदिसे,तेजस घोलप,भालचंद्र महाडिक,सय्यद अफरोज, भोला पाटील, परवेझ मॅक्रॉनी,संजय यादव,विजय शुक्ल, संतोष ता  माळी,विजय दूधनाथ यादव, रुपेश तुपे,केशव तिवारी, इस्माईल खान,केशरी सोळंकी, यास्मिन खान,फैजान खान,खालिद शेख, उत्तम कदम,संतोष ला माळी, राजू यादव,धीरेन शुक्ल,धीरेन शुक्ला,जिशान खान,जिशान शेख, अब्दुल खान,राहील पटेल,आसर्फ़ शेख,शाबान शेख,इरफान कुरेशी, रमेश रिते,मनोज आहिरे,संदीप गायकवाड यांच्यासह सेवादलाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की,शेतकरी वर्ग व कामगार वर्गासाठी केंद्र सरकारने सातत्याने धक्का तंत्राचा वापर करून वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करीत आले आहे,परंतु जनतेलाही आता भा.ज.पा.चे खरे धोरण काय आहे हे समजायला लागले आहे म्हणूनच जनता स्वतःहून आम्ही ठीकठीकाणी आयोजित केलेल्या मोहिमेत  सहभागी होत असल्याचे सांगितले. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर  नागरिक व कामगारानी सहभागी होउन आपला निषेध नोदविला.


ठाणे शहर जि सेवादल काँग्रेसच्या वतीने शेतकरी कामगार विघेयक कायदा विरोधात नागरिकांच्या "सह्याची मोहीम" सुरू ठाणे शहर जि सेवादल काँग्रेसच्या वतीने शेतकरी कामगार विघेयक कायदा विरोधात नागरिकांच्या "सह्याची मोहीम" सुरू  Reviewed by News1 Marathi on October 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads