Header AD

रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीतील मृतदेहाच्या आरोपींना ४ तासांत अटक महात्मा फुले चौक पोलिसांची कामगिरी
कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्वेकडील वालधुनी परिसरात सुरू असलेल्या रेल्वे कॅन्टीनच्या इमारती खाली पुरून ठेवलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून गडचिरोली जिल्ह्यातील मुकेश पोरेड्डीवार असे या मजुराचे नाव असून तो याच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पाणी मारण्याचे काम करत होता. दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून त्याच्या मित्रांनी त्याची केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बबलू उर्फ गुलामअली खान व अकिल अहमद कलीमुद्दीन खान या दोघांना अटक केली आहे. 

मयत मुकेश हा मजूर दुसरा मजूर बबलू उर्फ गुलामअली खान यांच्या समवेत एकाच खोलीत राहत होता. दररोज त्यांच्यात जेवण तयार करण्यावरून तसेच घरातील काम करण्यावरून भांडणे होत असत. ८ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० नंतर दारुच्या नशेत पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून बबलू याने उल्हासनगर मधील मित्र अकिल अहमद कलीमुद्दीन खानच्या मदतीने नळाचा पाईप आणि लोखंडी शिकंजीने मुकेशच्या डोक्यावर वार करून तसेच ओळख पटू नये यासाठी चेहरा ठेचून त्याचा मृतदेह त्याच इमारतीखाली पुरून टाकत बेपत्ता झाला होता.
मात्र रात्रीच्या सुमारास कुत्र्यांनी मृतदेहाचा काही भाग उकरून काढला. १० तारखेला सकाळी पाणी मारत असताना कामगारांना  हा मृतदेह आढळला. त्यांनी तत्काळ पोलिसांना  माहिती दिली. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत तपास सुरू केला. अंगातील कपडे आणि चादरीवरून हा मृतदेह मुकेश याचाच असल्याची ओळख पटवून वपोनि नारायण बानकरपोनि.गुन्हे. संभाजी जाधवडीबी पथकाचे सपोनि. सरोदे व स्टाफ यांनी ४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

 

रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीतील मृतदेहाच्या आरोपींना ४ तासांत अटक महात्मा फुले चौक पोलिसांची कामगिरी  रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीतील मृतदेहाच्या आरोपींना ४ तासांत अटक महात्मा फुले चौक पोलिसांची कामगिरी Reviewed by News1 Marathi on October 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads