Header AD

टिटवाळ्यात अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

 


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : "अ" प्रभागातील  टिटवाळ्यातील गणेश वाडी परिसरातील ५ अनाधिकृत खोल्याचे बांधकाम तसेच  २ अनाधिकृत  हातगाड्या व फुटपाथवरील अनाधिकृत मंडपावर  प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलित  जमीनदोस्त केले आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ' प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा गणेशवाडी परिसरात अनधिकृतपणे तयार झालेल्या  ५ खोल्याचे अनाधिकृत बांधकाम, तसेच टिटवाळा पुर्वैत २ अनाधिकृत हातगाड्या  फुटपाथवरील १ अनाधिकृत मंडपावर मनपाच्या अनाधिकृत बांधकाम अतिक्रमण नियंत्रण पथकाने  धडक कारवाई करीत हातोडा चालवित जमीनदोस्त केले.  


या कारवाईसाठी १ जेसी.बी. अनाधिकृत बांधकाम विभागचे आठ पोलीस कर्मचारी तसेच  अनधिकृत बांधकाम पथकाचे १० कर्मचारी "अ" प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने केलेल्या अनाधिकृत बांधकामावरील कारवाई मुळे  अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचा या कारवाईने धाबे दणाणले आहेत."


आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कारवाई चा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपी अँक्टनुसार गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू असणार असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.



टिटवाळ्यात अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा टिटवाळ्यात अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा Reviewed by News1 Marathi on October 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads