शाळेच्या फि मध्ये सवलती मिळण्या साठी डोंबिवलीतील पालकांचे मनसेकडे साकडे
डोंबिवली | शंकर जाधव : लॉकडाऊन मध्ये सर्व शाळा बंद असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरु करण्यात आली. मात्र यासाठी दरवर्षीप्रमाणे शाळेची फि आकारली जात आहे. कोरोनाच्या काळात नोकरी-व्यवसाय बंद असल्याने शाळेची फी कशी भरणार असा प्रश्न पालकवर्गाला पडला आहे.तर फिमध्ये अनेक बाबींसाठी आकारणी केली आहे. शाळा बंद असताना त्याबाबत आकारणी कशी होऊ शकते असा प्रश्न उपस्थित होते आहे.
शाळेच्या फिमध्ये सवलती मिळावी म्हणून काही पालकांनी मनसे साकडे घातले आहे.डोंबिवली मधील हॉली अॅगल शाळेच्या पालकांनी फि मधील सवलत व अन्य तक्रारी संदर्भात मनसे गोग्रासवाडी कार्यालयात कल्याण ग्रामीण अध्यक्ष मनोज घरत यांची भेट घेतली. यावेळी पालकांचे म्हणणे ऐकून त्यांच्या मागणीनुसार लवकरच शाळा प्रशासन व पालकांची संयुक्त बैठक आयोजित करु असे आश्वासन घरत यांनी यावेळी पालकांना दिले.

Post a Comment