Header AD

कल्याण डोंबिवलीत २२९ नवे रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू


एकूण ४६,४१६ रुग्ण तर ९०८  जणांचा आतापर्यंत  मृत्यू तर २४ तासांत ३३ रुग्णांना डिस्चार्ज....

 

कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २२९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आजच्या या २२९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४६,४१६ झाली आहे. यामध्ये ३३७३ रुग्ण उपचार घेत असून ४,१३५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९०८  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २२९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ४८कल्याण प – ५८डोंबिवली पूर्व ७७डोंबिवली प- २८,  मांडा टिटवाळा – १४मोहना – तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे. 


 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६३ रुग्ण टाटा आमंत्रामधून३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून२ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून१ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत २२९ नवे रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत  २२९ नवे रुग्ण तर ४  जणांचा मृत्यू   Reviewed by News1 Marathi on October 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads