फेकू नागरिकांवर मार्शलची करडी नजर पालिकेकडून २४ तास मार्शल तैनात
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली कचरा प्रश्न निकालीत काढण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. शहर कचराकुंडी मुक्त करण्याबरोबरच उघड्यावर कचरा न फेकता घंटागाडीत देण्याचे आवाहन पालिकेकडून केले जात आहे. मात्र आजही काही ठिकाणी नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेकडून मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे मार्शल २४ तास तैनात असून त्यांची करडी नजर उघड्यावर कचरा फेकणारयांवर असणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम अंतर्गत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी ठेकेदार, मार्शल व पालिकेचे कर्मचारी यांनी समन्वय साधत घटस्थापना ते विजया दशमीपर्यंत मोहीम सुरु केली आहे. त्यातच रात्रीचा उघड्यावर टाकला जाणाऱ्या कचर्यावर लक्ष ठेवण्यासाठी १०० मार्शलची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन उपयुक्त रामदास कोकरे यांनी दिली.
उघड्यावर कचरा टाकल्याने तो मिश्र कचरा होऊन डम्पिंग्वर जातो आणि कचऱ्याची समस्या निर्माण होते. ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे अशा ठिकाणी मार्शलची नेमणूक करण्यात आली असून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. लोकांच्या सवयीमध्ये बदल करण्यासाठी दंड आकाराला जात आहे. ज्या चाळी आणि सोसायाटीमध्ये घंटागाडी पोहचू शकत नाही अशाठिकाणी स्वच्छता दूत नेमून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

Post a Comment