Header AD

संतोष शेट्टी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपंगांना साहित्य वाटप

 



भिवंडी  |  प्रतिनिधी  :  भारतीय जनता पार्टीचे  भिवंडी शहरजिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.पद्मानगर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित विशेष अभिष्टचिंतन कार्यक्रमात अपंग व्यक्तिंना उपयोगी पडणारे वॉकर ,व्हीलचेअर ,चालण्यास मदत होणारी वॉकर स्टिक आदी साहित्यांसह सर्व अपंगांना भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.



या प्रसंगी आमदार महेश चौघुले,उद्योगपती हितेश मारू,भाजपा दक्षिण मंडळ अध्यक्ष राजेंद्र वासम,बालकिशन कल्याडप ,कोंका मल्लेशम ,दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष मोहन कोंडा ,युवक अध्यक्ष परेश चौघुले ,विशाल पाठारे, मोहन बल्लेवार ,सतिष शेट्टी ,राजेश शेट्टी आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर सकाळच्या सत्रात पडघा मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले.यावेळी भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांना  वाढदिवसानिमित्त दिवसभर  शुभेच्छा देण्यासाठी पद्मानगर येथील जनसंपर्क कार्यालयात भाजपा पक्षपदाधिकारी,कार्यकर्ते आदींसह महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी आदींनी गर्दी केली होती.
संतोष शेट्टी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपंगांना साहित्य वाटप संतोष शेट्टी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपंगांना साहित्य वाटप Reviewed by News1 Marathi on October 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads