कल्याणात सर्पमित्राने कोब्रासह धामणीला दिले जीवदान
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याणात शनिवारी सर्पमित्राने एक कोब्रा नाग, तसेच एका धामणीला पकडून जीवदान दिले आहे. कल्याण पश्चिमेतील कल्याण खाडी तीरा जवळील कोनगाव येथील डी. के. होम्स् कंपाऊंड परिसरातील इमारतीच्या जिनाच्या कोपऱ्यात कोब्रा जातीचा विषारी नाग बारा वाजण्याच्या सुमारास समीर इनामदार यांना आढळल्याने तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल करून बोलविले. घटनास्थळी पोहचत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सुमारे सहा फुट लांबीच्या विषारी कोब्रा जातीच्या नागाला पकडल्याने उपस्थित इमारतीतील रहिवाशांचा जीव भांड्यात पडला.

Post a Comment