Header AD

उत्‍सवांदरम्‍यान कोविड-१९ संदर्भात सामाजिक शिष्‍टाचार आवर्जून पाळा


मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटल्‍सचे इन्‍फेक्शिअस डिसीज स्‍पेशालिस्‍ट डॉ. किर्ती सबनीस यांचा लेख...


उत्‍सवी हंगाम सर्व स्‍तरातील लोकांना एकत्र आणतो. हे 'एकत्र येणे' सर्व समुदायांमध्‍ये सांस्‍कृतिक व भाषिक एकतेची भावना निर्माण करते. पण यंदा स्थिती अत्यंत वेगळी आहे. नवरात्री सुरू असताना 'वर्षाखेरचे सण' जसे दसरा, दिवाळी व नाताळ जवळच आले आहेत. नागरिकांना सार्वजनिक संमेलन टाळण्‍याचा, सामाजिक शिष्‍टाचार पाळण्‍याचा आणि घरामध्‍येच सण साजरा करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला आहे. केंद्रिय आरोग्‍य मंत्रालयाने जारी केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांनी लोकांना उत्‍सवी हंगामादरम्‍यान, तसेच 'संसर्गामध्‍ये मोठी वाढ होण्‍याची शक्‍यता असलेल्‍या' हिवाळी ऋतूदरम्‍यान कोविड-१९ संदर्भात योग्‍य ती काळजी घेण्‍याचे आवाहन केले आहे.


सामाजिक शिष्‍टाचारांचे पालन होण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या या आवाहनाला देशव्‍यापी 'जन आंदोलन' मोहिमेसह अधिक चालना देण्‍यात आली आहे. ही मोहिम लोकांना उत्‍सव साजरा करताना कोविड-१९ संसर्गाचा प्रसार टाळण्‍यासाठी संसर्गासंदर्भात नियमांचे योग्‍यरितीने पालन करण्‍यास प्रोत्‍साहित करते. 


ही अत्‍यंत महत्त्वाची वेळ आहे. आमची आरोग्‍यसेवा यंत्रणा, डॉक्‍टर्स, परिचारिका व नागरी प्राधिकरणे कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्‍ये विजयी ठरण्‍यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. आपण बहुप्रतिक्षित उत्‍सव साजरे करताना सामाजिक शिष्‍टाचारांचे पालन करत आपली भूमिका बजावू शकतो. तसेच आपल्‍या प्रियजनांना देखील सुरक्षित ठेवू शकतो. या उत्‍सवांचा आनंद घेताना घावयाच्‍या खबरदारीबाबत काही सूचना पुढीलप्रमाणे:  


१. शारीरिक संपर्क न करता शुभेच्‍छा द्या; सद्यस्थितीमध्‍ये हाताने नमस्‍कार करणे ही सुरक्षित शुभेच्‍छा आहे. 


२. मोठे संमेलने टाळा; प्राधिकरणांनी जारी केलेल्‍या नियमांचे पालन करा आणि श्‍वसनविषयक शिष्‍टाचार राखा. तुम्‍हाला खोकला, डोकदुखी किंवा सौम्‍य ताप अशी लक्षणे असल्‍यास बरे होईपर्यंत घरीच राहा. 


३. संसर्गाचा धोका कमी करण्‍यासठी तुमच्‍यामध्‍ये व इतरांमध्‍ये किमान १ मीटरचे अंतर ठेवा. तुम्‍ही घरात किंवा कार्यालयामध्‍ये असताना देखील याच सोशल डिस्‍टन्‍सचे पालन करा. तसे शक्‍य नसेल तर जास्‍त गर्दी टाळा. 


४. खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक हात किंवा टिशू पेपरसह झाका. त्‍यानंतर त्‍वरित टिशू पेपरची विल्‍हेवाट लावा आणि हात स्‍वच्‍छ धुवा किंवा सॅनिटाइज करा. 


५. मास्‍क परिधान करा: 


क. मास्‍क घालण्‍यापूर्वी, तसेच मास्‍क काढल्‍यानंतर हात स्‍वच्‍छ धुवा किंवा सॅनिटाइज करा. 

ख. नाक, तोंड व हनवुटीचा भाग व्‍यापून घेईल असे मास्‍क परिधान करा.

ग. दररोज कापडी मास्‍क स्‍वच्‍छ धुवत किंवा सिंगल युज मास्‍क्‍सची विल्‍हेवाट लावत मास्‍क स्‍वच्‍छता राखा. 


६. न धुतलेल्‍या किंवा सॅनिटाइज न केलेल्‍या हातांनी चेहरा व नाकाला स्‍पर्श करणे टाळा. 


७. इतर अति‍थींसोबत प्लेट्स, कटलरी, वॉटर कप किंवा टिश्यू पेपर शेअर करू नका.


८. तुमचे कुटुंब एकत्र येत असेल आणि जागा लहान असेल व हवा खेळती नसेल तर घरामध्‍येच सेलिब्रेशन करण्‍याऐवजी बाहेरील सुरक्षित जागा निवडा. घरामध्‍येच अधिक व्‍यक्‍तींसह साजरीकरण करणे टाळले पाहिजे, कारण लोक मोठमोठ्याने बोलतील, मोठ्या प्रमाणात श्‍वास घेतील आणि गातील, ज्‍यामधून संसर्गाचा धोका अधिक वाढेल.


९. उत्‍सवांदरम्‍यान पान, माऊथ फ्रेशनर चघळत सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. धूम्रपान करणे देखील टाळा. 


१०. शेअर्ड कारमध्‍ये एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्‍याचा व परत येण्‍याचा प्रवास टाळा. अति‍थींसाठी वापरण्‍यात आलेल्‍या कार्स योग्‍यरित्‍या स्‍वच्‍छ न करण्‍याची शक्‍यता असू शकते. तसेच अज्ञात व्‍यक्‍तींसोबत प्रवास करणे देखील टाळा. 


११. अतिथींची संख्‍या कमी ठेवा किंवा ई-दर्शन अवलंबा. यामुळे प्रत्‍येकजण सुरक्षितपणे त्‍यांच्‍या घरांमधूनच उत्‍सवांचा आनंद घेतील. 


१२. घरी परतल्‍यानंतर फूटवेअर घराबाहेर ठेवा, गरम पाण्‍याने आंघोळ करा आणि कपडे वेगवेगळे धुवा. कोणतीही लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधा आणि घरामध्‍येच इतर लोकांपासून स्‍वत:ला आयसोलेट करा.


१३. घरातील वृद्ध व्‍यक्‍तींनी अतिथींना शुभेच्‍छा देणे टाळावे. जर आवश्‍यकच असेल तर अतिथीपासून किमान १ मीटरचे अंतर ठेवा आणि मास्‍क परिधान करा.   

उत्‍सवांदरम्‍यान कोविड-१९ संदर्भात सामाजिक शिष्‍टाचार आवर्जून पाळा उत्‍सवांदरम्‍यान कोविड-१९ संदर्भात सामाजिक शिष्‍टाचार आवर्जून पाळा Reviewed by News1 Marathi on October 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads