शेतकरी व कामगार विरोधी विघेयक विरोधात ठाणे काँग्रेसचे धरणे आंदोलन
ठाणे | प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून घेतलीत तसेच काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत कामगारांना सुरक्षा देण्याकामी घैतलेला निर्णय बदलण्याची तयारी चालु केली आहे या विरोधात अ.भा.काॅग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने देशभरात 2 ऑक्टोबर रोजी "कीसान मजदूर बचाव दिवस"पाळण्यात येणार आला होता.
ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तलावपाळी येथील महात्मा गांधी उद्यानात या दोन्ही महान नेत्यांना अभिवादन करून""कीसान मजदूर बचाव दिवस "" पाळण्यात येउन याच ठीकाणी धरने आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व ठाणे जिल्हा प्रभारी राजेश शर्मा यांनी उपस्थिती लावली होती अतिशय शिस्तीत हे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment