Header AD

केडीएमटीची कल्याण पनवेल बस सेवा सुरु वाशी मार्गावर देखील लवकरच होणार बस सुरु सभापती मनोज चौधरी

  कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन विभागाची कल्याण पनवेल ब सेवा आजपासून पुन्हा सुरु झाली असून यामुळे पनवेल परिसरात कामाला जाण्याऱ्या कल्याण मधील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर नवीमुंबई वाशी, कोकण भवन या मार्गांवर देखील लवकरच केडीएमटीची बस सेवा सुरु होणार असल्याचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी सांगितले.


लॉकडाऊनमुळे रेल्वेची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने कल्याण मधील नोकरदार नागरिकांना एसटीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र एसटी मध्येही गर्दी होत असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची परिवहन विभागाची बस सेवा पनवेल, वाशी आणि  ठाणे मार्गावर सुरु करण्या बाबतचे पत्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परिवहन सभापती मनोज चौधरी यांना दिले होते. खासदारांच्या या पत्राची त्वरित दखल घेत या मार्गावर बस सेवा सुरु करण्यासाठी सभापती मनोज चौधरी यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आज पासून पनवेल बस सेवा सुरु केली आहे.
आज सकाळी ६ वाजेपासून पनवेल मार्गावरील बस सुरु झाल्या असून दर अर्धा ते एक तासांनी नागरिकांना पनवेलसाठी बस उपलब्ध होणार आहे. परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी कल्याण एसटी डेपोत जाऊन पनवेल बस मधील प्रवाशांशी संवाद साधत प्रवाशांना प्रवास करतांना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.


कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून केडीएमटीची परिवहन सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर ऑगस्ट महिन्यात गणपती पासून कल्याणच्या आसपासच्या मार्गावर बस सेवा सुरु करण्यात आली. आता अनलॉक मध्ये नागरिक आपल्या कामावर जात असल्याने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने कल्याण पनवेल बस सुरु करण्यात आली असून येत्या आठवडाभरात वाशी, कोकण भवन, ठाणे या मार्गांवर देखील बस ससुरु करण्यात येतील अशी प्रतिक्रिया परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी दिली. 


यावेळी परिवहन सदस्य अनिल पिंगळे, वाहतूक निरीक्षक किशोर घाडी, प्रमोद बागुल, रघुनाथ वाजे, जवाहरलाल चव्हाण आदी परिवहनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.        

केडीएमटीची कल्याण पनवेल बस सेवा सुरु वाशी मार्गावर देखील लवकरच होणार बस सुरु सभापती मनोज चौधरी केडीएमटीची कल्याण पनवेल बस सेवा सुरु वाशी मार्गावर देखील लवकरच होणार बस सुरु  सभापती मनोज चौधरी Reviewed by News1 Marathi on October 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads