Header AD

नौपाडा कोपरी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार
ठाणे  |  प्रतिनिधी  :  ठाणे महानगरपालिकेच्या नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रातील कन्हैयानगर जलकुंभ व धोबीघाट जलकुंभ येथील राधाकृष्ण मंदिरासमोर सॅटीस कामात बाधित होत असलेली 400 मी.मी. व्यासाची आऊटलेट जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे कामाकरीता बुधवादिनांक 21 ऑक्टोबर, 2020 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवारदिनांक 22  ऑक्टोबर, 2020 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत (24 तासपाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे


उपरोक्त शटडाऊनमुळे कन्हैयानगर जलकुंभ व धोबीघाट जलकुंभ क्षेत्रातील कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगरी, नातु कॉलनी, सावरकरनगर, वाल्मिमीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, क्रिष्नानगर, स्वामी समर्थ मठ, आनंदनगर, गांधीनगर, सिध्दिविनायक नगर, सिध्दार्थनगर, बारा बंगला, ठाणेकर वाडी, कोपरीगांव, जगदाळे वाडी, पै गल्ली इत्यादी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहील.


या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असूननागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे

नौपाडा कोपरी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार नौपाडा कोपरी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार Reviewed by News1 Marathi on October 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads