Header AD

नेफ्रोप्‍लस या भारताच्‍या सर्वात डायलिसिस नेटवर्कला मिळाला फिलिपाइन्‍समधील रॉयल केअर डायलिसिस सेंटर्समध्‍ये बहुतांश हिस्‍सा


मुंबई  :  नेफ्रोप्‍लस या भारतातील सर्वात मोठ्या डायलिसिस नेटवर्क, तसेच भारतातील डायलिसिस केअरला परिभाषित करण्‍यामध्‍ये अग्रणी असलेल्‍या कंपनीने पहिल्‍या प्रमुख जा‍गतिक संपादनाची घोषणा केली. नेफ्रोप्‍लसने उच्‍च दर्जाची केअर सुविधा असण्‍यावर सखोल फोकस देणारे फिलिपाइन्‍समधील प्रतिष्ठित डायलिसिस नेटवर्क 'रॉयल केअर डायलिसिस सेंटर्स, इन्‍क. (आरसीडीसी)'मध्‍ये बहुतांश हिस्‍सा प्राप्‍त केला. या धोरणात्‍मक सहयोगाच्‍या माध्‍यमातून नेफ्रोप्‍लस जागतिक पातळीवर विस्‍तारित होणारे पहिले भारतीय डायलिसिस नेटवर्क बनले आहे, ज्‍यामुळे कंपनी मल्‍टी-नॅशनल कॉर्पोरेशनमध्‍ये (एमएनसी) बदलली आहे. पहिल्‍या जागतिक संपादनाबाबत बोलताना नेफ्रोप्‍लसचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विक्रम वुप्‍पला म्‍हणाले, ''आम्‍हाला आमच्‍या नेटवर्कमध्‍ये आरसीडीसीमधील टीमची भर करताना आनंद होत आहे. आरसीडीसीच्‍या या नेतृत्‍व टीमसोबत सहयोगाने काम करत आम्‍ही आता पुढील ५ वर्षांमध्‍ये फिलिपाइन्‍समधील सर्वात मोठे डायलिसिस नेटवर्क बनण्‍याचा मनसुबा बाळगून आहोत. आम्‍ही आमच्‍या विस्‍तारीकरण योजनांना चालना देण्‍यासाठी अगोदरच फिलिपाइन्‍समधील विविध डायलिसिस केंद्रांसोबत चर्चा करण्‍यास सुरूवात केली आहे. फिलिपाइन्‍समधील या प्रवेशासह आम्‍ही आशिया, आखाती देश व सीआयएस भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये अग्रणी मल्‍टीनॅशनल नेटवर्क निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करतो.''या सहयोगाबाबत बोलताना नेफ्रोप्‍लसचे सह-संस्‍थापक आणि रूग्‍णसेवा विभागाचे संचालक श्री. कमल शाह म्‍हणाले, ''आमची विविध देशांमधील रूग्‍णांना किफायतशीर दरांमध्‍ये सर्वोत्तम केअर सुविधा देण्‍याची इच्‍छा असताना हा सहयोग नेफ्रोप्‍लससाठी आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेतील मोठे पाऊल आहे. आम्‍हाला फिलिपाइन्‍समधील रूग्‍णकेंद्रित केअरसंदर्भात सर्वोत्तम पद्धती सादर करण्‍याचा आनंद होत आहे. तसेच आम्‍ही भारतामध्‍ये आरसीडीसीच्‍या सर्वोत्तम पद्धती सादर करण्‍याप्रती देखील उत्‍सुक आहोत. हे बहुराष्‍ट्रीय कार्यसंचालन कौशल्‍य भारतातील आमचे नेफ्रोलॉजिस्‍ट व हॉस्पिटल भागीदारांमधील नेफ्रोप्‍लसच्‍या ब्रॅण्‍ड इक्विटीला लक्षणीयरित्‍या दृढ करेल.''  

नेफ्रोप्‍लस या भारताच्‍या सर्वात डायलिसिस नेटवर्कला मिळाला फिलिपाइन्‍समधील रॉयल केअर डायलिसिस सेंटर्समध्‍ये बहुतांश हिस्‍सा नेफ्रोप्‍लस या भारताच्‍या सर्वात डायलिसिस नेटवर्कला मिळाला फिलिपाइन्‍समधील रॉयल केअर डायलिसिस सेंटर्समध्‍ये बहुतांश हिस्‍सा Reviewed by News1 Marathi on October 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads