हाथरस अमानुष घटनेचा रिपब्लिकन पक्षातर्फे आझाद मैदानात आंदोलना द्वारे निषेध
मुंबई | प्रतिनिधी :- उत्तर प्रदेशातील हाथरसच्या दलित युवतीची निर्घृण अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या अमानुष कृत्याचा आज रिपब्लिकन पक्षातर्फे आझाद मैदान येथे तीव्र निदर्शने आंदोलनाद्वारे नीषेध करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या पत्नी आणि रिपाइं महिला आघाडी च्या नेत्या सौ सीमाताई आठवले यांनी केले. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर ; रमेश गायकवाड; प्रकाश जाधव; ऍड.आशाताई लांडगे; ऍड.अभयाताई सोनवणे; उषाताई रामळु;शिरीष चिखलकर; सोना कांबळे; विशाल गायकवाड; उषाताई वाघमारे; सचिन आठवले; आदी अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

Post a Comment