Header AD

उप्र.मधील महिला पिडितेला न्याय मिळावा व उप्र.सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची निदर्शने
डोंबिवली | शंकर जाधव  :  उत्तर प्रदेश हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर चार तरुणांनी केलेल्या अमानुष अत्याचार व पाशवी बलात्कारामुळे तिचा दु:खद मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. देशभरात उत्तर प्रदेश मधील या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे.डोंबिवली पुर्वेकडील इंदिरा चौकात वंचित बहुजन आघाडीने उप्र.मधील महिला पिडितेला न्याय मिळावा व उप्र.सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी निदर्शने केली.


माजी डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोकेजिल्हा संघटक मिलिंद साळवे, उपाध्यक्ष  राजू काकडे, प्रसिद्धीप्रमुख पँथर सेना ठाणे जिल्हा दीपक भालेराव,सुरेंद्र छापरवाल, बाजीराव माने,शिवा कांबळे,आशा ठोके, निशा छापरवाल आदींनी निदर्शने केली. निदर्शने करताना वंचित बहुजन आघाडीच्या पदधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उप्र.सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हा संघटक साळवे म्हणाले,ह्या अतिशय गंभीर घटनेनंतर तेथील स्थानिक पोलिसांनी पिडीतेला मदत करण्यास टाळाटाळ केली व त्याविरुद्ध आरडाओरडा होईपर्यंत गुन्हा ही नोंदवून घेतला नव्हता. पिडितेच्या कुटुंबाला विश्वासात न घेता मध्यरात्री अंधारात तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचे काम केले. 


उप्रच्या शासनाची कायदा गुंडाळून ठेवण्याची व गुंडाना पाठीशी घालण्याच्या भूमिकेमुळेच महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून या देशात महिला सुरक्षित आहेत का?असा प्रश्न पडतो. उप्र, महाराष्ट्रात व संपूर्ण देशात वारंवार अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता धोक्यात आहे.

उप्र.मधील महिला पिडितेला न्याय मिळावा व उप्र.सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची निदर्शने उप्र.मधील महिला पिडितेला न्याय मिळावा व उप्र.सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची निदर्शने  Reviewed by News1 Marathi on October 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads