कल्याण डोंबिवलीकरांना आता दंडाचा `लाल दिवा`राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याने कल्याण डोंबिवलीतील ३४ चौकात लागणार सिग्नल यंत्रणा
डोंबिवली | शंकर जाधव : मुंबई, नवी मुंबई, ठाणे,पुणे या शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी याकरता सिग्नल यंत्रणा आहे. मात्र स्मार्ट सिटीत आपली पाठ थोपवून घेणाऱ्या युती सत्तेला जे आजवर जमले नाही ते राष्ट्रवादीने करून दाखवले. तब्बल दोन वर्ष पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर यश आले आहे. कल्याण- डोंबिवलीतील ३४ चौकात लागणार सिग्नल यंत्रणा कार्यरत होणार असून लॉकडाऊन मध्ये कल्याणात चार –पाच चौकात सिग्नल यंत्रणा सुरु झाली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांनी आता सिग्नल तोडले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे.
कल्याण डोंबिवली शहर जिल्हा राष्ट्रवादी अर्बन सेल प्रमुख प्रवीण मुसळे यांनी २७ ऑगस्ट २०१८ रोजी कल्याण – डोंबिवली शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी तत्कालीन वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे आणि तत्कालीन पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.तसेच निवेदन देताना लवकरात लवकर दोन्ही शहरात सिग्नल यंत्रणा सुरु करण्याची विनंती केली.यावर पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस विभागाने सकारात्मक भूमिका घेतली.अखेर दोन वर्षांनंतर मुसळे यांच्या प्रयत्नाला यश आले.लॉकडाऊनच्या काळात कल्याण पश्चिम येथील आधारवाडी चौक,खडकपाडा चौक तर कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका चौक येथे सिग्नल लावण्यात आले आहे. डोंबिवलीत अद्याप सिग्नल लावले नसले तरी लवकरच कल्याण-डोंबिवली शहरातील ३४ चौकात सिग्नल यंत्रणा लावण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहित देताना मुसळे म्हणाले, यासंदर्भात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार वंदना चव्हाण, खासदार धनंजय मुंडे, आमदार जगन्नाथ शिंदे यान पत्र दिले होते. कल्याण-डोंबिवलीत वाहनांची संख्या वाढत आहे.मात्र वाहतूक नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून आले. आपले शहर स्मार्ट असले तरी सिग्नल यंत्रणा नसली तर वाहतूक कोंडी होतच राहणार. वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस उभे करणे शक्य नाही. यासाठी चौकात सिग्नल लावणे अत्यावश्यक आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेची समस्या १०० टक्के सुटणार नसली तरी याला नियंत्रण येऊ शकते. शहरात सिग्नल यंत्रणा सुरु झाल्यास वाहतूक पोलीसांच्या डोक्यावरील ताण कमी होणार आहे.तर वाहनचालक वाहतूक नियमाचे पालन करतील अशी अपेक्षा मुसळे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Post a Comment