राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कामा संघटनेतर्फे रक्तदान शिबीर
डोंबिवली | शंकर जाधव : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कामा संघटना, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि कल्याण-डोंबिवली रनर्र्ल यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्वेकडील कामा संघटनेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी,सचिव राजू बैलूर, माजी अध्यक्ष मुरली अय्यर, कल्याण-डोंबिवली रनर्र्लचे के.आर.कृष्णनन,सुरज शेट्टी, रंजिता घरत,यांसह अनेकजन उपस्थित होते. यावेळी ६० रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या. या शिबिरात तरुण- तरुणींनी रक्तदान केले.
यावेळी देवेन सोनी म्हणाले,कामा संघटना नेहमी समाजउपयोगी कामे करत असतात.कोरोनाच्या काळात रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून आमच्याकडून हा प्रयत्न आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याने यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला. कोणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि जर दुर्देवाने जर कोणी कोरोना बाधित झाले तर त्याचा जीव वाचवा म्हणून डॉक्टर्स आणि केंद्र आणि राज्य सरकार ज्याप्रमाणे शर्तीचे प्रयत्न करत आहे त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी सरकारला आणि प्रशासनाला मदत केली पाहिजे.

Post a Comment