पाण्यासाठी सर्व काही आमदार संजय केळकर
ठाणे | प्रतिनिधी : आमदार संजय केळकर यांनी घोडबंदर परिसरातील ब्रम्हांड, पाटलीपाडा, हिरानंदानी, वाघबीळ, कोलशेत भागातील पाणी समस्ये बाबत नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी पाणी कमी प्रमाणात येत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी आ. केळकर यांच्याकडे केल्या असता त्यांनी याबाबत महापालिकेत अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा केली व पाणी कमी प्रमाणात येण्याची कारणे काहीही असोत, पाणी प्रश्न हा प्राधान्याने सुटला पाहिजे असे आ. केळकर यांनी सांगून टँकरची गरज लागू नये या करिता स्टेम प्राधिकरणाकडून अधिकच पाणी मिळणेबाबत मी आग्रह धरला आहे असेही त्यांनी बोलताना सांगितले.
तसेच महापालिकेने नियमित, अखंडीत, आवश्यक पाणी वितरण करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा पाणी आंदोलन केलं जाईल असा इशाराही आमदार संजय केळकर यांनी यावेळी दिला.

Post a Comment