Header AD

कळवा पूर्व प्रभाग क्रमांक 25 येथे पोलीस चौकीचे उद्घाटन

 


कळवा  |  अशोक घाग   :  राष्ट्रवादी पार्टी च्या वतीने महापालिका निवडणुकीमध्ये वचनपूर्ती कामाचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता आज प्रभाग क्रमांक 25 कळवा पूर्व भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेविका निधीतुन नवीन पोलिस चौकीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ठाणे महानगरपालिका सफाई कामगारांसाठी हजेरी शेड उभारण्याचे कामाचे भूमिपूजन व घोलाई नगर डोंगर पट्ट्यामध्ये नवीन पाण्याची लाईन व पंप रूम मीटर ची उद्घाटन सुद्धा करण्यात आले त्याप्रसंगी नगरसेवक मिलिंद पाटील माजी विरोधी पक्षनेते स्थानिक नगरसेविका वर्षा अरविंद मोरे नगरसेवक महेश साळवी कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार दरेकर ठाणे शहर सचिव अरविंद मोरे प्रभाकर सिंह हो या भागातील नागरिक उपस्थित होते.

या कामाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकांना संबोधित केले की या भागातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत होण्यासाठी विशेष करून या भागातील महिला वर्गाने या परिसरामध्ये पोलीस चौकी असावी अशी मागणी केली होती तसेच हा भाग डोंगराळ असल्यामुळे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात होती आज नवीन लाईन आल्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे साफसफाई बाबत तक्रार करण्यासाठी आता नागरिकांना कळवा प्रभाग समिती मध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

कळवा पूर्व प्रभाग क्रमांक 25 येथे पोलीस चौकीचे उद्घाटन कळवा पूर्व प्रभाग क्रमांक 25 येथे पोलीस चौकीचे उद्घाटन Reviewed by News1 Marathi on October 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads