Header AD

भिवंडी मनपा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी, स्वच्छ सर्वेक्षण 2021 उपक्रम महापौर यांच्या हस्ते सुरवात
भिवंडी  |  प्रतिनिधी  :  भिवंडी महानगरपालिकेत आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या शुभहस्ते राष्टपिता  महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मंडईतील महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्यास  महापौर प्रतिभा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत भिवंडीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेची सुरुवात महापौर प्रतिभा पाटील यांच्याहस्ते  सुरू करण्यात आली.  
महापौर प्रतिभा पाटील यांनी महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेली स्वच्छता करावी,  स्वच्छता ही दैनंदिन जीवनाचा भाग आहे व ती एक सवय असावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. मागील वर्षांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणामध्ये भिवंडी शहराला चांगले मानांकन मिळालेले आहे. याबाबत सर्व नागरिकांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करून, यापुढे देखील भिवंडी शहर स्वच्छ सुंदर ठेवणे आणि नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचा संदेश महापौर यांनी आजच्या स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने सर्व जनतेला दिला आहे. भिवंडीतील जनतेने चांगल्याप्रकारे स्वच्छता मोहीम राबवून आपले मानांकन परत चांगल्या प्रकारे टिकवण्याची जबाबदारी आहे असे नमूद करून महापौर  यांनी सर्व जनतेला महात्मा गांधी 151 व्या  जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यालय उपायुक्त डॉक्टर दीपक सावंत, उपायुक्त आरोग्य मारुती गायकवाड, प्रशासनाधिकारी सुभाष झळके, विद्युत कार्यकारी अभियंता  सुनील पाटील, आरोग्य  अधिकारी अशोक संखे, जयवंत सोनावणे, हरीश भंडारी, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, प्रभाग समिती एकचे सहाय्यक आयुक्त दिलीप खाने,  करमुल्यांकन विभाग कार्यालय अधीक्षक बाळाराम जाधव, माध्यमिक शिक्षण विभाग प्रमुख सुनील झळके, इत्यादी अधिकारी व अन्य कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. गांधी जयंतनिमित्त सर्व प्रभाग समिती निहाय शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

भिवंडी मनपा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी, स्वच्छ सर्वेक्षण 2021 उपक्रम महापौर यांच्या हस्ते सुरवात भिवंडी मनपा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी, स्वच्छ सर्वेक्षण 2021 उपक्रम महापौर यांच्या हस्ते सुरवात Reviewed by News1 Marathi on October 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads