Header AD

बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले बिहार विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 14 उमेदवारपटना  |  दि.२२  :  नितीशकुमार हे बिहार मध्ये विकासपुरुष म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वात एनडीएला बहुमत मिळेल.नितीशकुमारच पून्हा बिहार चे मुख्यमंत्री होतील असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी  व्यक्त केला. बिहार च्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 14 उमेदवार निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचारासाठी ना रामदास आठवले काल बिहार दौऱ्यावर आले होते. जहाणाबाद येथे रिपाइं चे उमेदवार सतीश कुमार कुशवाहा आणि गया मधील टेकरी या  मतदारसंघातील रिपाइं उमेदवारांच्या प्रचार सभांना ना रामदास आठवले यांनी संबोधित केले. रिपब्लिकन पक्ष नोंदणीकृत पक्ष असल्याने काही जागांवर निवडणूक लढणे आवश्यक होते. तसेच जेडीयु आणि भाजप च्या एनडीए आघाडीत रिपाइं ला जागा सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बिहार विधानसभेत रिपाइं 14 जागांवर स्वबळावर लढत असून अन्य 229 जागांवर एनडीए ला रिपाइं चा पाठिंबा असल्याची घोषणा ना रामदास आठवले यांनी केली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले)बिहार विधान सभेतील उमेदवारांची यादी 


1- शिव नारायण मिश्रा - टेकरी मतदारसंघ गया 
2-  सतीश कुमार कुशवाहा  - मतदारसंघ - जहानाबाद 
3- दिनेश मंडल - मधुबणी विधानसभा मतदारसंघ 
4- रामजी राय - बेल संड सितामढी
 5- विजयश्री प्रसाद - दरभंगा 
6- बबलू गुप्ता - खजौली मधुबणी 
7 - अनिलकुमार यादव -  बाबूबरही मधुबणी 
8- श्रीमती नूतन झा - बेनिपट्टी मधुबणी
9- धर्मेंद्र कुमार  ठाकूर - मुझफ्फरपूर शहर 
10 - मनोज पूर्वे - सुरसंड सितामढी 
11- सुंदरम सोनू - सीमरी ; बखतीयारपुर सहरसा 
12 - राम कुमार भगत - फरविस गंज; आरारीया
13 - दिनेश कुमार यादव - सिकटी आरारीया
14 - विंदेश्वर महतो-  रीगा  सीतामढी
बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले बिहार विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 14 उमेदवार बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले बिहार विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 14 उमेदवार Reviewed by News1 Marathi on October 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads