100महिला कोरोना योध्द्यांचा नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका सौ.नम्रता भोसले-जाधव यांनी केला सन्मान
ठाणे | प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या युध्दात प्रत्यक्ष उतरुन निस्वार्थीपणे अतुलनीय कामगिरी केलेल्या प्रभागातील रहिवासी व प्रभागात सेवा देणाऱ्या कर्तृत्ववान १०० महिलांचा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ``कोरोना रणरागिणी' ’ पुरस्काराने शिक्षण समिती सभापती, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या संकल्पनेतून सन्मान करण्यात आला.
कोरोना महामारीच्या युध्दात फ्रंटफूट वर महिला काम करत आहेत. सफाईकामगार, आरोग्य सेवेतील काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, स्टाफ, पोस्टमन, विविध शासकीय, निमशासकीय आणि पालिकेत काम करणाऱ्या या महिला जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या सर्व महिलांनी केलेल्या कामाची दखल घेतली जावी म्हणून नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी या महिलांना कोरोना रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.

Post a Comment