Header AD

गणेशोत्सवातून जपली सामाजिक बांधिलकी


कल्याण | दि ६ | कुणाल म्हात्रे  : "गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी" या उपक्रमांतर्गत सामाजीक कार्यकर्ते  गजानन पाटील यांच्याकडे पाच दिवसीय घरगुती गणेशोत्सव काळात गणेश भक्तांकडून जमा झालेले शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे कार्य मागील पाच वर्षांपासुन सुरू आहे. परंतु यंदा कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे गणेश भक्तांवरच निर्बंध आल्यामुळे गणपतीचे मखरच  शैक्षणिक साहित्याने करण्यात आली. 

गणपती विसर्जनानंतर मखर सजावटीचे साहित्य शनिवारी भालिवडी जांभूळवाडी (ता-कर्जत,जि-रायगड) येथील दुर्गम भागातील गरजू  विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिक्षण प्रेमी ॲड् शशिकांत पाटील, प्रेमनाथ पाटील, विजय पाटील, दिलिप वझे, निलेश म्हात्रे, मंगेश खुटारकर, मधुकर माळी, शिवाजी माळी उपस्थित होते.
 

गणेशोत्सवातून जपली सामाजिक बांधिलकी गणेशोत्सवातून जपली सामाजिक बांधिलकी   Reviewed by News1 Marathi on September 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads