Header AD

सुपरकार्समध्ये सामील झालेल्या मसेराटी: MC20 करिता ब्रिजस्टोन’चे कस्टम बिल्ट पोटेन्झा टायर्स
◆ MC20 करिता ब्रिजस्टोन हे विशेष टायर पार्टनर, मसेराटी’ची नवीन सुपरकार. | कस्टम पद्धतीने विकसीत केलेल्या ब्रिजस्टोन पोटेन्झा टायर्समुळे वाहन हाताळण्याची क्षमता वाढते तसेच वाहन चालविण्यात कमाल गती गाठून सुपर स्पोर्ट्स कारची एकंदर कामगिरी सुधारते. | ब्रिजस्टोनच्या ग्राउंड-ब्रेकिंग व्हर्च्युअल टायर डेव्हलपमेंट टेक्नोलॉजीमुळे टायरच्या विकसीत प्रक्रियेची कार्यशीलता आणि टिकाऊपणा वृद्धिंगत होतो.मुंबई : MC20, मसेराटी या नवीन सुपर स्पोर्ट्स कारकरिता विशेष टायर पुरवठादार म्हणून ब्रिजस्टोनची निवड झाली. या भागीदारीमुळे क्षेत्रातील दोन मातब्बर एकमेकांसोबत आले असून ब्रिजस्टोनसमवेत मसेराटीच्या नवीन MC20 अद्वितीय क्षमतेला सर्वोत्तम, कस्टम-इंजिनीअर्ड पोटेन्झा टायर्समुळे चालना मिळाली.

 

कामगिरीच्या मर्यादा विस्तारल्या

आश्चर्यात पडणारी भर म्हणजे नवीन MC20 मसेराटीकरिता सर्वोत्तम प्रीमियम टायर्सची आवश्यकता असते, ज्यामुळे अद्वितीय कामगिरी दिसून येते. ब्रिजस्टोन हा मसेराटीचा दीर्घकालीन भागीदार असून आपल्या खास बनावटीच्या पोटेन्झा टायर्ससोबत संक्षिप्त आणि परिवर्तनशील वास्तव साकारतो.

 

MC20 च्या वतीने मसेराटीची अत्याधुनिक तांत्रिक आणि अभियांत्रिकी कल्पकतेचे सादरीकरण होते. यापूर्वीच्या मॉडेल्सच्या तुलनेत पिढीनुरूप बदल झालेला दिसतो. MC20 ची उत्तम क्षमतेची कामगिरी क्षमता सुधारण्यात ब्रिजस्टोनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. या वाहनाच्या बिस्पोक पोटेन्झा टायर्ससमवेत असिमेट्रीक ट्रेड डिझाईन स्टीअरींगचा अनुभव विस्तारीत होतो, कोपराकडे स्थिरता लाभते. नव्याने विकसीत ट्रेड कंपाउंडमुळे चांगली पकड बसते. आतील क्राऊन रचनेमुळे अगदी कोपराकडे देखील पावलाचा समान दाब पडतो. हे घटक एकत्रित झाल्यावर टायरची कामगिरी उत्तम ठरते. ज्यामुळे अधिक नियंत्रण, वेग आणि स्थैर्य मिळते. ज्याचा परिणाम सुपरकारच्या एकंदर कामगिरीवर दिसतो. 

 

इटलीत जन्मलेल्या मोटरस्पोर्ट्सचा विजय

ब्रिजस्टोन आणि मसेराटी दरम्यान झालेल्या दीर्घकालीन भागीदारीत मोटरस्पोर्ट्स रेसिंग इतिहासाची मुळे आहेत. फॉर्म्युला वन रेसिंगसोबतच्या दीर्घकालीन नात्यामुळे ब्रिजस्टोनच्या पोटेन्झा टायर्सचा जन्म झालातर MC20  ने मसेराटीच्या रेसिंग मुळात प्रवेश केला आहे. ऑन आणि ऑफ ट्रॅक दोन्हीकडे अद्वितीय परिणाम गाठणे हा कंपनीचा संस्थापक डीएनए आहे.

 

ब्रिजस्टोन आणि मसेराटी या दोघांनी नवीन एमसी 20 आणि त्याच्या बिस्पोक टायर्स विकसित आणि चाचणी करण्यासाठी इन-हाऊस आर अँड डी सेंटर आणि ग्राउंड ब्रेकिंग व्हर्च्युअल डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी वापरली. त्याच्या मालकीच्या व्हर्च्युअल टायर मॉडेलिंग तंत्रज्ञानाद्वारेब्रिजस्टोनने कमी संसाधनांचा वापर करून आणि पर्यावरणाचा प्रभाव मर्यादित ठेवूनविकास प्रक्रियेची लांबी देखील कमी केली. अंदाजे 24 महिन्यांत तयार झालेल्या एमसी 20 डिझाइनसह हे अधिक कार्यक्षम प्रक्रियेत सहाय्य करते. दोन्ही उद्योग-दिग्गजांसाठीनाविन्यपूर्णटिकाऊ तंत्रज्ञानाचा समावेश करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. नजीकच्या काळात एमसी 20 चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात आणण्याची योजना आहे.

 

या घोषणेविषयी बोलताना ब्रिजस्टोन ईएमआयएचे व्हीपी कन्झ्युमर रिप्लेसमेंट आणि ओई स्टीव्हन डे ब म्हणाले की: युरोपात पूर्णपणे विकसीत, तपासलेले आणि निर्मिती झालेले हे कस्टम-डिझाईन पोटेन्झा टायर मसेराटीची उच्चतम मागणी पूर्ण करणारे आहेत. आम्ही खास अभियांत्रिकीचा वापर करून तयार केलेले हे पोटेन्झा टायर मसेराटीच्या MC20 ला शक्ती, नियंत्रण आणि स्पोर्टींग क्षमता प्रदान करतात.

 

MC20 प्रकल्प हा ब्रिजस्टोन आणि मसेराटी दरम्यान नातेसंबंध दृढ करणारा नवीन भाग आहे. आमच्यात नाविन्य आणि सर्वोत्तमतेत परस्पर साम्य आहे. आम्हाला ग्राहकांना अद्वितीय परिणाम देणारी उत्पादने देऊ करायची आहेत. दोघांचे डिझाईन इटलीत तयार होते, नवीन मसेराटी MC20 आणि बिस्पोक ब्रिजस्टोन पोटेन्झा टायरची जोडी एकमेकांना साजेशी आहे. ब्रिजस्टोन निर्मित स्पोर्ट्स टायर हे MC20 करिता साह्य देणे तसेच अद्वितीय कामगिरी विस्तारण्यासाठी सक्षम आहेत,” असे मसेराटी वेहिकल लाईन एक्झिक्यूटीव्ह स्पोर्ट्स कार्सच्या फेडेरिको लँडीनी यांनी सांगितले.

 


सुपरकार्समध्ये सामील झालेल्या मसेराटी: MC20 करिता ब्रिजस्टोन’चे कस्टम बिल्ट पोटेन्झा टायर्स सुपरकार्समध्ये सामील झालेल्या मसेराटी: MC20 करिता ब्रिजस्टोन’चे कस्टम बिल्ट पोटेन्झा टायर्स Reviewed by News1 Marathi on September 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण परिमंडलात वीजबिलाची थकबाकी पोहचली ६०० कोटींवर

  ■वर्षभरापासून बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा होतोय   खंडित.... कल्याण , कुणाल  म्हात्रे :   महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल थकबा...

Post AD

home ads