Header AD

कल्याण डोंबिवलीत २९६ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू


 

◆ एकूण रुग्ण ३,४६८ तर ७८० जणांचा आतापर्यंत

 मृत्यू तर २४ तासांत ५७८ रुग्णांना डिस्चार्ज....



कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आजच्या या २९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३,४६८ झाली आहे. यामध्ये ४८५९ रुग्ण उपचार घेत असून ३३,८२९  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २०कल्याण प  १५४डोंबिवली पूर्व ८६डोंबिवली प- २५मांडा टिटवाळा मोहना –तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे. 



 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८८ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून ३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून७ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत २९६ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत २९६ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणा बेस मेटल व कच्च्या तेलाला आधार

  मुंबई, २६ नोव्हेंबर २०२० :  अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस म...

Post AD

home ads