Header AD

डायमंड बुक ऑफ रेकॉर्डने कल्याणचे कवी नवनाथ रणखांबे सन्मानित


कल्याण | कुणाल म्हात्रे   : अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने सलग ८५ तास चालणारे कविसंमेलन ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कुल येथे आयोजित केले गेले होते. साहित्य क्षेत्रात ठसा उमटवून कल्याणच्या नावलौकिकात  भर घालणारे  हरहुन्नरी कवी नवनाथ रणखांबे यांनी विक्रमी कविसंमेलनात सहभाग  घेतला होता. या कविसंमेलनाच्या विक्रमाची ऐतिहासिक डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद  झाली आहे. त्यामुळे  कवी नवनाथ रणखांबे यांची डायमंड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहभागाची नोंद झाली असून त्यांना उपक्रम प्रमुख डॉ. योगेश जोशी यांच्याहस्ते सन्मानपत्र आणि मेडल देऊन कल्याणमध्ये सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि विविध पुरस्काराने सन्मानित असलेले कवी नवनाथ रणखांबे हे  इंडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित आहेत.


डायमंड बुक ऑफ रेकॉर्डने कल्याणचे कवी नवनाथ रणखांबे सन्मानित डायमंड बुक ऑफ रेकॉर्डने कल्याणचे कवी नवनाथ रणखांबे सन्मानित   Reviewed by News1 Marathi on September 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads