Header AD

मांडा टिटवाळा येथील नागरिकांनी घेतला केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ नगरसेविका उपेक्षा भोईर यांचा उपक्रम
कल्याण  |  कुणाल  म्हात्रे   :   केंद्र सरकारने विविध योजना आणल्या आहेत. याचा लाभ गरजूंना नागरिकांना मिळावा म्हणून टिटवाळा येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात १ महिना जेष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन योजनांचे कॅम्प राबविले असता ४५० लाभार्थींनी याचा लाभ घेताला. या उपक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर आणि स्थानिक नगरसेविका उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी केले होते.


आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनाजेष्ठ नागरिक कार्डमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन या योजनेचे काही कार्ड वाटप नुकतेच करण्यात आले. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेमार्फत नागरिकांना ५ लाखाचा विमामहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत लाभार्थ्यांना २ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ घेता येणार आहे. तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन योजनेमार्फत प्रतिमहिना ३ हजारांपर्यंत पेंशनचा लाभ घेता येणार आहे. तर जेष्ठ नागरिक कार्ड मध्ये विविध फायदे घेता येतील.
यावेळी माजी उपमहापौरनगरसेविका उपेक्षा भोईरमोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश खांबोरकर, वॉर्ड क्रमांक ८ चे अध्यक्ष गजानन मढवी, वॉर्ड क्रमांक १० अध्यक्ष किरण रोठे, कार्यकर्ते विवेक पुराणिकसंजय आदगळेविजय देशमुखवैभव पुजारीकेतन कान्हेरेविनायक भोईर, अजय मिश्राअरविंद पाटीलकिरण पाटील, कमलेश राठोड आदींच्याहस्ते कार्ड वाटप करण्यात आले.

मांडा टिटवाळा येथील नागरिकांनी घेतला केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ नगरसेविका उपेक्षा भोईर यांचा उपक्रम मांडा टिटवाळा येथील नागरिकांनी घेतला केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ नगरसेविका उपेक्षा भोईर यांचा उपक्रम  Reviewed by News1 Marathi on September 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच पुन्हा अडकला पोलिसांच्या जाळयात

भिवंडी , प्रतिनिधी  :  लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईत घरफोड्याने दोन साथीदारांसह भिवंडी ताल...

Post AD

home ads