Header AD

गोवा सरकारने कॉन्व्हेजिनियसच्या मदतीने अंगणवाड्यांमध्ये ई-लर्निंग उपकरणे आणली


गोवा भारत : गोवा सरकारच्या महिला  बालविकास विभागाने राज्यातील अंगणवाड्यांमधील मुलांना ई लर्निंग उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत सिमेन्स लिमिटेडच्या मदतीने एक प्रकल्प राबवला आहेयासाठी भारतातील हिमाचल प्रदेशआंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यासारख्या १६ राज्यांमध्ये यासारखाच प्रकल्प नुकताच राबवणाऱ्या कॉन्व्हेजिनियस या प्रसिद्ध एड टेक कंपनीची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

 

ही प्रगत शिक्षण प्रणाली सत्तेरी आणि पोंडा येथील अंगणवाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाईल-लर्निंगचा हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मिशन’ या व्हिजन अंतर्गत राबवला जात आहेया पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये याचा विस्तार करण्याची योजना आहे.

 

कॉन्व्हेजिनियसने ईसीसीई गाइडलाइन्सनुसार कोकणी आणि इंग्रजी भाषेत शैक्षणिक सॉफ्टवेअर तयार केले आहे.अंगणवाड्यांना दिलेल्या या डिजिटल सेटअपमध्ये शैक्षणिक सॉफ्टवेअरअसलेले स्मार्ट टीव्ही आणि टॅबलेटचा समावेश आहेकॉन्व्हेजिनियसने तयार केलेले हे साहित्य विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करतील तसेच त्यांना प्रेरणा देतीलतसेच टॅबलेट आधारीत डिजिटल शिक्षण पद्धतीद्वारे एल-एस-आर-डब्ल्यू(लिसनिंग-स्पिकिंग-रायटिंग-रीडि गयांचा विकास होऊन मुलांमध्ये आत्मविश्वास निर्मााण होईल ही शिक्षण प्रणाली प्रत्येक मुलाच्या कामगिरीची नोंद ठेवतेतसेच मुलांना माहितीचे स्पष्टपणे स्मरण होण्याकरिता मदत करतेयासोबतच अभ्यासातील प्रोग्राम्स आणि सरावात मुलांना रस निर्माण होतो.

 

महिला  बालकल्याण मंत्री श्री विश्वजित राणे म्हणालेअंगणवाड्यांमध्ये  लर्निंग आणण्याचे माझे अनेक दिवसांचे स्वप्न होतेआता सिमेन्स आणि कॉन्व्हेजिनियच्या माध्यमातून ते पूर्ण होत असताना पाहून मला खूप आनंद होतोयपहिल्या सहा वर्षांमध्येच मुलांचा ९० टक्के मेंदू विकसित होत असतोआणि धड्यांचे अत्याधुनिक नियोजनतंत्रज्ञान सक्षम वर्ग आणि निवडक अभ्यासक्रमाद्वारे अंगणवाडीतील मुले मुख्य प्रवाहातील शाळेत पहिल्या वर्गात जाण्यासाठी तयार होतीलऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या शैक्षणिक अॅक्टिव्हिटीज वाढतील आणि तंत्रज्ञानाचीही ओळख होईलआमचे माननीय मुख्यमंत्री डॉप्रमोदसावंत यांनी आमच्या प्रत्येक प्रकल्पात आम्हाला पाठींबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

 

कॉन्व्हेजिनियसचे सहसंस्थापक जयराज भट्टाचार्य म्हणाले“ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतनव्या एनईपी गाइडलाइन्सनुसारमूलभूत साक्षरता आणि गणितावर भर देण्यात आला आहेआमच्या डिजिटल अभ्यासक्रमाचा उद्देश शिक्षणाचा निकाल वाढवणे आणि नियोजनबद्ध डिजिटल परिवर्तन घडवणे हा आहेदेशात जवळपास १६ राज्यांमध्ये सुरू झालेल्या नया भारत मोहिमेअंतर्गत सुरु झालेल्या एडटेकसाठी भारतातील १०० दशलक्षांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याच्या आमच्या उद्दिष्टाशी ही संकल्पना जुळते.

गोवा सरकारने कॉन्व्हेजिनियसच्या मदतीने अंगणवाड्यांमध्ये ई-लर्निंग उपकरणे आणली गोवा सरकारने कॉन्व्हेजिनियसच्या मदतीने अंगणवाड्यांमध्ये ई-लर्निंग उपकरणे आणली Reviewed by News1 Marathi on September 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

Ganesh Deshmukh Saheb Happy Birthday

 

Post AD

home ads