Header AD

नरेंद्र मोदींच्यावाढदिवसा निमित्त कल्याण मध्ये स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण


 ◆ भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांचे आयोजन...

कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिमेत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गरजूंना मदत करणे आदी विविध उपक्रमांचा समावेश असून  त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेतील गजानन महाराज मंदिराजवळबेतूरकर पाडायेथे वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी भटके विमुक्त आघाडीचे महराष्ट्रातील पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. सामाजिक कामं करून पंतप्रधानांना अनोख्या शुभेच्छा कार्यकर्त्यांनी दिल्या असल्याची माहिती यावेळी माजी आमदार आणि भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी दिली.


दरम्यान यावेळी प्रजापती ब्रह्मकुमारी विश्र्विद्यालयच्या अलका दीदी, प्रदेश सरचिटणीस संतोष आव्हाड, गजानन महाराज मंदिर विश्वस्त गणेश खैरनार, ओबीसी आघाडी प्रदेश सचिव अनिल पंडित, अशोक वणवेनिहारिका खोंदलेयशवंत वैदूअशोक शेळकेगोविंदा गुंजाळकरअजय कदम, कल्पेश जोशी, रितेश फडके, निखील चव्हाण, प्रताप ठुमकर, रोहित लांबतुरेजनार्धन कारभारीगौतम दिवाडकरसुनील शेट्टी प्रकाश पाटील,रोहित जाधवउमेश पिसाळ, सुनील शेट्टी, किशोर खैरनार, विजय शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.  नरेंद्र मोदींच्यावाढदिवसा निमित्त कल्याण मध्ये स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण नरेंद्र मोदींच्यावाढदिवसा निमित्त कल्याण मध्ये स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण Reviewed by News1 Marathi on September 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads