Header AD

एम्ब्युलन्स वेळेवर न मिळाल्याने अपघातग्रस्त वृद्ध महिलेचा मृत्यू


 ◆  रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर महिलेचा जीव वाचला असता शिवसेना नगरसेवकाची प्रशासनावर आगपाखड


कल्याण | कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन ९५ रुग्णवाहिका तैनात असल्याचा दावा  करत असले तरी कल्याण पूर्वेत अपघात ग्रस्त वृद्ध महिलेला वेळेवर एम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने त्या ठिकाणाहून जाणाऱ्या पोलीस व्हॅन ने महिलेला रुग्णलयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला. याबाबत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर महिलेचा जीव वाचला असता असा आरोप केला आहे.

आज सायंकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील पूना लिंक परिसरात एका बाईकस्वाराने एका वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळी पोहचलेले नगरसेवक महेश गायकवाड यांनी एम्ब्युलन्सला फोन केला मात्र तासभर एम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. याच दरम्यान या रस्त्यावरून  कोळसेवाडी पोलिस स्टेशनची पोलिसव्हॅन जात होती. नगरसेवक गायकवाड व नागरिकांनी यांनी तत्काळ व्हॅन थांबवून पोलिसांना विनंती केली. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता जखमी महिलेला व्हॅन मध्ये घेतले. गायकवाड यांनी या महिलेला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला झाला होता.

 दरम्यान जर वेळेवर उपचार मिळाले असते तर महिलेचा मृत्यू झाला नसता वेळेवर एम्ब्युलन्स न मिळाल्याने तिला वेळेत रुग्णलयात नेता आले नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे. 

एम्ब्युलन्स वेळेवर न मिळाल्याने अपघातग्रस्त वृद्ध महिलेचा मृत्यू एम्ब्युलन्स वेळेवर न मिळाल्याने अपघातग्रस्त वृद्ध महिलेचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads