Header AD

बुश येथील कोविड रूग्णालय कार्यान्वित रूग्ण दाखल करण्यास सुरूवात महापालिका आयुक्तांची माहिती


महापालिकेच्यावतीने बुश कंपनी येथे उभारण्यात आलेल्या कोविड रूग्णालयामध्ये रूग्ण दाखल करण्यात आल्याचे छायाचित्र...


ठाणे | प्रतिनिधी :  वागळे प्रभाग समितीतंर्गत बुश कंपनीच्या आवारात ठाणे महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेले कोविड रूग्णालय कार्यान्वित करण्यात आले असून तेथे आता रूग्ण दाखल करण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिली.


काही दिवसांपूर्वीच कोरोना विरूद्धच्या लढाईला बळ देणा-या बुश कंपनी येथे ठाणे महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड रूग्णालयाचा अनौपचारिक लोकार्पण सोहळा आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला होता.


त्या रूग्णालयामध्ये आता रूग्णांना दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. या ठिकाणी सर्व सुविधा तसेच वैद्यकिय व वैद्यकेत्तर कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.या रूग्णालयामध्ये एकूण ४४० बेडस् असून यातील ३५० बेडस् हे ॲाक्सीजन बेडस् आहेत तर साधे बेडसची क्षमता ९० इतकी आहे.

बुश येथील कोविड रूग्णालय कार्यान्वित रूग्ण दाखल करण्यास सुरूवात महापालिका आयुक्तांची माहिती बुश येथील कोविड रूग्णालय कार्यान्वित  रूग्ण दाखल करण्यास सुरूवात महापालिका आयुक्तांची माहिती Reviewed by News1 Marathi on September 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा

ठाणे , प्रतिनिधी  :   सालाबादप्रमाणे राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा करण्यात येतो ह्या सं...

Post AD

home ads