Header AD

कल्याण - मुरबाड रेल्वेची खासदार कपिल पाटील यांच्याकडून लोकसभेत मागणी


भिवंडी  |  प्रतिनिधी  :  मुरबाडमधील नागरिकांकडून 50 वर्षांपासून रेल्वेची वाट पाहिली जात असून, मुरबाडमधील जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी कल्याण-मुरबाड रेल्वेचे काम लवकर सुरू करावे, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी काल बुधवारी लोकसभेत केली.


भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे मुरबाड गाव आहे. मात्र, मुरबाडपर्यंत रेल्वे सुरू होण्यासाठी मुरबाडवासीय 50 वर्षांपासून वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. त्या निर्णयाने हजारो मुरबाडवासीयांना दिलासा मिळाला. सध्या या रेल्वेमार्गाचा अंतिम प्रकल्प प्रकल्प आराखडा (डीपीआर) नीती आयोगाकडे लवकरच मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. 


मुरबाडवासियांचे पाच दशकांचे स्वप्न साकार करण्यासाठी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी काल लोकसभेत तातडीने सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर लक्ष वेधण्याच्या नियमानुसार केली.कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी 962 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारतर्फे 50 टक्के खर्च उचलण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या रेल्वेमार्गासाठी खासदार कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.


कल्याण - मुरबाड रेल्वेची खासदार कपिल पाटील यांच्याकडून लोकसभेत मागणी कल्याण - मुरबाड रेल्वेची खासदार कपिल पाटील यांच्याकडून लोकसभेत मागणी Reviewed by News1 Marathi on September 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads