Header AD

भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर कल्याण पूर्व अध्यक्षपदी अविनाश ओंबासे यांची नियुक्ती

कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  शिक्षक दिनाचे औचित्य साधून भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कल्याण पूर्वेतील तिसाई हाउस याठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकार्यांना पद नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले.

शिक्षक आघाडीच्या कल्याण पूर्व अध्यक्षपदी अविनाश ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी ललिता मोरे, सुप्रिया नाईकर, राहुल खंदारे, उपाध्यक्षपदी श्रीकांत त्रिपाठी, मुकुंद गायधनीसुधाकर ठोके, सुभाष गायकवाड, तेज नारायण सिंह, उर्मिला सिंह, नसीम शेख, चिटणीसपदी संगीता वर्मा, सचिदानंद तिवारी, राम निंबाळकर, लीपिका पाल, जगतनारायण उपाध्याय, भानू प्रताप सिंह, अविनाश पाटील, राकेश कुरकुरे, विमलेश दुबे, विकास गुप्ता, प्रभुनारायण दुबे, अरविंद मोरे, सदस्यपदी जितेंद्र महाजन, संजय उपाध्याय, सुहास गायकवाड, कविता कुशवाह अशी जम्बो कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

कल्याण पूर्व मधील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ मुख्याध्यापक व शिक्षकांनी एकत्र येऊन कल्याण पूर्वच्या  विकासात्मक कामे याबद्दल आपले योगदान द्यावे. तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोणतेही प्रश्नअडचणी आणि समस्या असतील तर ते शेवटच्या घटकापर्यंत जाऊन सोडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर असतो आणि पुढेही असेल असे आश्वासन आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी दिले. 


 

भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर कल्याण पूर्व अध्यक्षपदी अविनाश ओंबासे यांची नियुक्ती भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर कल्याण पूर्व अध्यक्षपदी अविनाश ओंबासे यांची नियुक्ती  Reviewed by News1 Marathi on September 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads