Header AD

कचराकुंडी मुक्त शहरासाठी प्रशासनाला भाजपचे सहकार्य

   



डोंबिवली |  शंकर जाधव  :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सर्व शहरे `कचराकुंडी मुक्त` होण्यासाठी शासनाच्या निर्देशाचे पालन करत पालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरु केले. मात्र प्रशासन काही ठिकाणी कमी पडत असल्याने भाजप प्रशासनाला सहकार्याची भूमिका बजावीत आहे.डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी परिसरात कचराकुंडी हटवण्यात आली मात्र येथील नागरिक याच ठिकाणी ओला नि सुका कचरा वर्गीकरण न करता टाकत असतात.पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागा लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरीक करत आहेत.यावर भाजपचे नगरसेवक साई शेलार यांनी अनेक वेळेला संबंधित विभागाला पत्र देऊन सहकार्य करण्याची विनंती केली.यावर प्रशासने जेसीबीच्याने सदर ठिकाणचा कचरा उचलला आहे. शासनाचे नियम सर्वाला समान असून रस्त्यावर कचरा टाकलास दंडात्मक कारवाई केली जाईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.


नागरी घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ कलमांतर्गत आणि राज्य शासनचा २०१९ चा आदेशानुसार रस्त्यावर कचरा टाकणे, ओला-सुका कचरा वर्गीकरण न करता कचरा देणे यांच्यावर पालिका प्रशासनाला दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आले आहे.त्यानुसार प्रशासन काम करत असून काही नागरीक या नियमांचे पालन करत नसल्याने कचराकुंडी मुक्त शहर होण्यास अडथळे निर्माण होत आहेत.डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी जवळ कचराकुंडी हटवून पालिका प्रशासनाने दरदिवशी घंटागाडी येण्याची वेळ सांगण्यात आली. मात्र काही नागरीक घंटागाडीत ओला-सुका कचरा कचरा वेगळा करूनच देत असतात.मात्र काही नागरिक नागरिक या नियमाचे पालन न करता कचराकुंडी हटविल्याच्याठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी येत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची ओरड होत आहे.त्यासाठी सदर ठिकाणचा कचरा उचलावा असे पत्र भाजप नगरसेवक साई शेलार यांनी दिल्याचे पदाधिकारी राजू शेख यांनी सांगितले. 


भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे,  भाजप शहर सचिव राजू शेखयुवा मोर्चा वार्ड अध्यक्ष रुपेश पवारकिरण राळेनागेश हिरोले,  बि्रजपाल चव्हाण,  कृष्णा  गटू यांनी या कामात प्रशासनाला सहकार्य केले. घनकचरा व्यवस्थापन विभागाने यांची दाखल घेत सदर ठिकाणचा कचरा उचलला.याबाबत आरोग्य निरीक्षक वंसत डेगलूरकर यांना विचारले असता ते म्हणाले, कायदा सर्वाना समान आहेत.येथील नियमांचे पालन केले असते असते तर सदर ठिकाणी कचरा साठला नसता.येथील नागरिकांना नियमांची माहिती देण्यात आली होती. भाजप प्रशासनाला सहकार्य करत आहे ही चांगली गोष्ट आहे. परंतु नागरिकांनी नियमाचे पालन केले नाही तर त्याच्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

कचराकुंडी मुक्त शहरासाठी प्रशासनाला भाजपचे सहकार्य कचराकुंडी मुक्त शहरासाठी प्रशासनाला भाजपचे सहकार्य Reviewed by News1 Marathi on September 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५१ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू

  ■४९ , ९२८  एकूण रुग्ण तर   १००२  जणांचा आतापर्यंत मृत्यू  तर २४ तासांत   १६७  रुग्णांना डिस्चार्ज... कल्याण  | कुणाल म्हात्रे  :    कल्याण...

Post AD

home ads