Header AD

कल्याण डोंबिवलीत लॉकडाउनचा विचार नाही - पालिका आयुक्त


कल्याण  | कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना शहरात लॉकडाऊन लागू करण्याची मागणी काहींनी केली असून तर सोशल मिडीयावर देखील पालिका क्षेत्रात लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. याबाबत पालिका आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांना विचारले असता, शहरात लॉकडाऊन करण्याचा विचार नसून दुकानदारांसह नागरिकांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे, अन्यथा त्यांच्या सक्त कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहे.

गेल्या १० दिवसापासून कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची चर्चा सोशलमिडियावर रंगली आहे. या चर्चेला पूर्णविराम देत लॉकडाऊनचा प्रश्न निकाली काढत  सध्या  कुठलाही लॉकडाउन करण्याची स्थितिमधे महापालिका नाही.  परंतु स्थानिक नागरिकव्यापारीदुकानदार सलून चालक व कारागीर  मास्क, सोशल डिस्टेंसींगच्या नियमाचे  पालन करताना दिसत नाही.  त्यामुळे अश्या दुकानदारांवर सक्त  कार्रवाई करणे आवश्यक असल्याचे  आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

तसेच राज्य सरकारच्या  आदेशानुसार शहरातील  ४  लाख ५० नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मिशन झीरोच्या अंतर्गत कोरोना  टेस्टसामाजिक संस्था द्वारे एंटीजरन टेस्ट कॅप मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहेत. आता  महापालिकेची स्वतःची  आईसीयूऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा झाली आहे. त्यामुळे  येत्या काही दिवसात रुग्णांची आकडेवारी बरीच कमी  होणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.


कल्याण डोंबिवलीत लॉकडाउनचा विचार नाही - पालिका आयुक्त कल्याण डोंबिवलीत लॉकडाउनचा विचार नाही -  पालिका आयुक्त Reviewed by News1 Marathi on September 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads