Header AD

पाणी प्रश्नी आंदोलनाचा इशारा देताच आयुक्तांचे त्वरित अॅक्शन घेण्याचे आश्वासन


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  चाळकरयांचे पाणी वळवून मोठ्या गृह संकुलास देण्याच्या प्रकारावर माजी नगरसेवकाने आंदोलनाचा इशारा देताच याबाबत पालिका आयुक्तांनी त्वरित अॅक्शन घेण्याचे आश्वासन दिले आहे.  

कल्याण पूर्वेतील गणेश वाडी प्रभागातील शक्ती धाम मधील नवीन गृहसंकुलास बाजूच्या प्रभाग असलेल्या कोळसेवाडी विकासनगर पाण्याच्या टाकीतून जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. कोरोनाच्या काळात कोणाचे लक्ष नसल्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात केली.  या जलवाहिनी मुळे परिसरात अधीकच पाणी टंचाई समस्यां भेडसावणार असल्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामाला येथील स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी विरोध केला.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग कोळसेवाडी परिसरातील गणेश वाडी प्रभागातील शक्ती धाम मधील नवीन गृहसंकुलास मोठी जलवाहीनी टाकण्यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मंजुरी दिल्याने या परिसारातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम त्वरित थाबविण्यासाठी  माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी पालिका आयुक्त व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्याकडे पत्रव्यवहार केला होता. पालिका आयुक्तांना रसाळ यांनी या जलवाहिनी मुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची सत्य परिस्थिती मांडल्याने अखेरीस पालिका आयुक्तांनी जलवाहिनी टाकण्याच्या कामाची चौकशी करून ऍक्शन घेतली जाईल असे आश्वासन दिल्याचे उदय रसाळ यांनी सांगितले. 


पाणी प्रश्नी आंदोलनाचा इशारा देताच आयुक्तांचे त्वरित अॅक्शन घेण्याचे आश्वासन पाणी प्रश्नी आंदोलनाचा इशारा देताच आयुक्तांचे त्वरित अॅक्शन घेण्याचे आश्वासन Reviewed by News1 Marathi on September 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads