ठाणे | प्रतिनिधी : आरक्षणाबाबत 10 महिन्यापासून झोपी गेलेल्या कुंभकर्ण सरकार विरोधात पद्मश्री खासदार विकास महात्मे यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी ठाण्यात पद्मश्री खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे,आमदार नरेंद्र पवार,राजू बर्गे,धनगर समाज संघर्ष समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी, निहरिका कोंदले,अशोक शेळके,डॉ अरुण गावडे,माजी नगरसेविका विशाखा खताळ,धनगर प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक कुरकुंडे,कार्याध्यक्ष महेश गुंड,आदी सह धनगर समाज बांधव उपस्थित होते.
धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे. राज्य सरकार विरोधात पद्मश्री खासदार विकास महात्मे यांनी ठाण्यातून आंदोलनाची हाक दिली आहे.धनगर समाज संघर्ष समितीच्या माध्यमातून शुक्रवारी कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी "ढोल बजाव, सरकार जगाव" हे आंदोलन करण्यात आले.
राज्यभरात धनगर समाजाने वेगवेगळ्या पातळ्यांवर हे आंदोलन केले आणि समाजानेही या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जागे आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे, पद्मश्री खासदार विकास महात्मे यांनी यावेळी सांगितले. गेल्या दहा महिन्यांपासून सरकार सत्तेमध्ये आलेले आहे. मात्र धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक पाऊलही सरकारने उचललेलं नाही,तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतुदी केली होती. मात्र त्यामधील एक रुपया सुद्धा या सरकारने दिला नाही, याशिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका ही सरकारकडून घेण्यात आली नाही,असा आरोप पद्मश्री खासदार विकास महात्मे यांनी केला आहे.
Post a Comment