Header AD

एमजी मोटर ऑटो पार्क असिस्टसह 'ग्लॉस्टर' लॉन्च करणार


मुंबई, ३ सप्टेंबर २०२०:
 २०१९ पासून, एमजी मोटर इंडिया ही कंपनी कनेक्टेड कार टेक्नोलॉजीचे भविष्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या मर्यादा ओलांडत आहे. एमजी आता नव्या टप्प्यात प्रवेश करत असताना, स्मार्ट मोबिलिटीच्या नव्या लाटेत येताना आम्हाला उत्साह जाणवत आहे. आम्ही आता ऑटो पार्क असिस्ट फिचरसह एमजी ग्लॉस्टर (Gloster) सादर करत आहोत. ग्लॉस्टर ही भारताची पहिली ऑटोनॉमस (लेव्हल १) प्रीमियम एसयुव्ही आहे.

ग्लॉस्टर हे नाव एमजीच्या ब्रिटिश वारशाला आदरांजली देण्यासारखे असून याचा अर्थ मजबूत, खंबीर, विश्वासार्ह आणि अष्टपैलू असा होतो. ग्लॉस्टर हे ब्रिटिश जेट-इंजिन एअरक्राफ्ट प्रोटोटाइप होते. ब्रिटिशांच्या महान अभियांत्रिकीसाठी हे नाव प्रसिद्ध आहे. सर्वोत्कृष्ट सुविधायुक्त, रस्त्यावरून जाताना सतर्कता बाळगणारी, शक्तीशाली क्षमता, लक्झरीयस इंटेरिअर असलेली ग्लॉस्टर ही भारतीय वाहन क्षेत्रात नवा मापदंड रोवण्यासाठी सज्ज आहे.

Video Link - https://we.tl/t-epHfX8ACTN

एमजी मोटर ऑटो पार्क असिस्टसह 'ग्लॉस्टर' लॉन्च करणार  एमजी मोटर ऑटो पार्क असिस्टसह 'ग्लॉस्टर' लॉन्च करणार Reviewed by News1 Marathi on September 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads