Header AD

पोलीस अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांचे कोरोनाने निधन


कल्याण | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिमेतील उंबर्डे या गावाचे स्थानिक भूमिपुत्र आणि पोलीस खात्यात एक सच्चा आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ख्याती असलेले आणि राज्य शासनाचा पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांचे कोरोनाने निधन झाले आहे.

गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात त्याचे उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पोलीस खात्यासह कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागात ए. एस. आय. सिद्धार्थ गायकवाड (५६) कार्यरत होते. पोलीस खात्यात एक भूमिपुत्र म्हणून ओळख होती. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे हे त्यांचे मुळगाव.

समाजाची बांधिलकी असलेलागोरगरिबांना मदत करणारारियल कोरोना योद्धा आणि जनतेची सेवा करत असतांना सिद्धार्थ गायकवाड यांचे कोरोनाने निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.

पोलीस अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांचे कोरोनाने निधन पोलीस अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांचे कोरोनाने निधन   Reviewed by News1 Marathi on September 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads